नवी दिल्ली : नवी दिल्ली : दिल्लीतील शकरपूर भागातील एका सरकारी शाळेबाहेर शुक्रवारी एका अवघ्या १४ वर्षीय विद्यार्थ्याची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे. इशू गुप्ता (१४) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. सध्या आरोपींची चौकशी सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना ३ जानेवारीला घडली. शुक्रवारी इशू एक्स्ट्रा क्लास नंतर शाळेतून बाहेर पडत होता. दरम्यान, इशू आणि अन्य एका विद्यार्थ्यामध्ये वाद झाला. यानंतर आरोपीने त्याच्या ३ ते ४ साथीदारांसह इशूवर चाकूने हल्ला केला. शाळेच्या गेटसमोर ही घटना घडली. इशूच्या उजव्या मांडीवरही वार करण्यात आले होते. यानंतर तो गंभीर जखमी झाला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून विद्यार्थ्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
इशूच्या हत्येप्रकरणी उच्च पोलीस अधिकाऱ्यांनी शकरपूर पोलीस स्टेशन, अमली पदार्थ विरोधी पथक आणि विशेष कर्मचाऱ्यांची पथके तयार करून हल्लेखोरांना लवकर अटक करण्याचे निर्देश दिले. याप्रकरणी पोलिसांनी ७ संशयितांना अटक केली आहे. इशूचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. मात्र, विद्यार्थ्यांमध्ये मारामारीचे कारण काय? या प्रकरणी अद्याप माहिती मिळालेली नाही.
बातमी अपडेट होत आहे.