कारचालकाला पोलिसांनी घेतले ताब्यात
म्हापसा : पुणे येथे येरवडा कारागृहाजवळ दुचाकीला कारने ठोकरल्याने म्हापशातील आशीर्वाद नागेश गोवेकर व रेश्मा रमेश गोवेकर या दीर-भावजयीचा मृत्यू झाला. ते मूळ कारवारमधील असून वैद्यकीय उपचारासाठी ते पुण्याला गेले होते. पुणे विमानतळ पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतले.
म्हापसा येथील गोवेकर कुटुंबीय वैद्यकीय उपचारासाठी पुणे येथे गेले होते. गुरुवारी आशीर्वाद नागेश गोवेकर व रेश्मा रमेश गोवेकर हे दुचाकीने जात होते. येरवडा कारागृहाजवळ त्यांच्या दुचाकीला एका कारने ठोकरले. यात आशीर्वाद जागीच ठार झाला. तर, रेश्मा हिचा इस्पितळात उपचारावेळी मृत्यू झाला. पुणे विमानतळ पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक पोटे पुढील तपास करीत आहेत.