पेडणे : फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे मांद्रे येथील माळरान पेटले

माळरानावरील अनेक झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी; काजू बागायतीचे आतोनात नुकसान

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
01st January, 04:09 pm
पेडणे : फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे मांद्रे येथील माळरान पेटले

पेडणे : मध्यरात्री नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. रात्री १० नंतर फटाके जाळण्यास बंदी असूनही मांद्रे आणि येथील किनारपट्टी परिसरात स्थानिक आणि पर्यटकांनी लाखो रुपयांचे फटाके जाळले. यामुळेच जुनसवाडा-मांद्रे येथील डोंगरावरील माळरानाला आग लागली. प्राप्त माहितीनुसार, फटाक्यांमुळे पसरलेल्या या आगीत सुमारे ३००० झाडे भस्मसात झाली तर येथील काजू बागायतीचे देखील प्रचंड नुकसान झाले आहे.  

स्थानिक लोकांनी येथे लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न केला. येथील तरुण मिळेल त्या साधनांचा वापर करून माळरानावर पसरलेली आग आटोक्यात आणत होते. तरीही येथील झाडे वाचवण्यात यश आले नाही. पर्यावरण प्रेमींनी या घटनेचा निषेध केला आहे. 


हेही वाचा