फोंडा : मुर्डी - खांडेपार येथे शुक्रवारी मध्यरात्री बेकायदेशीरपणे रेतीवाहू करणारा ट्रक केतन भाटीकर यांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केला. काही दिवसांपूर्वी केतन भाटीकर यांनी परिसरातील बेकायदेशीरपणे सुरु असलेला रेती व्यवसाय बंद करण्याची मागणी केली होती. बेकायदेशीरपणे रेती वाहतूक करणारा ट्रक फोंडा पोलिसांनी जप्त केला आहे.
मुर्डी परिसरात मोठ्या प्रमाणात रेती उपसा केला जात असल्याचे काही दिवसापूर्वी केतन भाटीकर यांनी उघड केले होते. रेती व्यवसाय सुरु राहिल्यास वाहतूक रोखून धरण्याचा इशारा देखील त्यांच्याकडून देण्यात आला होता. त्यानुसार शुक्रवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास केतन भाटीकर यांनी जीए -०१- डब्ल्यू -७४७८ क्रमांकाचा ट्रक रोखून धरला. त्यानंतर रेती भरलेला ट्रक फोंडा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला. निरीक्षक विजयनाथ कवळेकर यांनी बेकायदेशीरपणे रेती वाहतूक करणारा ट्रक जप्त केला आहे. याप्रकरणी अधिक तपास करण्यात येत आहे.