पणजी : मधूबन जंक्शननजीकच्या रहिवासी इमारतीजवळ आढळले गांजाचे रोपटे

दोन दिवसांत दुसरी घटना

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
06th January, 11:37 am
पणजी : मधूबन जंक्शननजीकच्या रहिवासी इमारतीजवळ आढळले गांजाचे रोपटे

पणजी:  शीतल हॉटेल ते मधुबन जंक्शन रस्त्यानजीक असलेल्या झरीना टॉवर या इमारतीसमोर गांजाचे एक रोपटे उगवल्याचे समोर आले आहे. नीट निरखून पाहिल्यास हे रोपटे विशेष काळजी घेऊन वाढवल्यासारखे दिसत आहे. तरीही हे रोपटे नेमके येथे कसे आले यावर तर्क-कुतर्कांना ऊत आला आहे.  




परवाच काकुलो मॉलजवळ देखील  एक रोपटे आढळून आल्यानंतर एएनसीने ते ताब्यात घेतले होते. फुटभर लांबीचे प्रथमदृष्ट्या गांजासदृश दिसणारे हे रोपटे पाहून लोकांनी अंमली पदार्थ विरोधी पथकाशी संपर्क साधला. एएनसी अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी ते रोपटे तपासासाठी पाठवले. 




तपासणीसाठी अधिकाऱ्यांनी येथील मातीचे नमुने गोळा केलेत. दरम्यान या रोपट्यांना जेव्हा फूल येते तेव्हा त्याचा गांजा बनतो. सदर रोपत्यास अद्याप फुल आले नव्हते असे यावेळी एएनसी पोलीस निरिक्षक संजीत पील्ले यांनी सांगितले होते. दरम्यान आज पुन्हा गांजाचे रोपटे आढळून आल्यानंतर पुन्हा खळबळ उडाली आहे. 



बातमी अपडेट होत आहे. 

हेही वाचा