पेडणे : पेडणे मतदारसंघ भाजप मंडळाच्या अध्यक्षपदी पेडणे नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक सिद्धेश पेडणेकर यांची निवड करण्यात आली. तर माजी जिपं सदस्य सूर्यकांत तोरसकर यांची मंडळाच्या निमंत्रक म्हणून निवड झाल्याचे पक्षाचे निरीक्षक, माजी आमदार दयानंद सोपटे यांनी जाहीर केले.
यावेळी व्यासपीठावर आमदार प्रवीण आर्लेकर, मावळते गट मंडळ अध्यक्ष तुळशीदास गावस, उपनगराध्यक्ष विशाखा गडेकर, विविध पंचायतींचे सरपंच, उपसरपंच, पंच, नगरसेवक आदी उपस्थित होते.
यावेळी माजी आमदार सोपटे म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून पेडणे मतदारसंघातून भाजपचा उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येत आहे. अशाच प्रकारे आगामी २०२७ मधील विधानसभा निवडणुकीतही या मतदारसंघातून भाजपचा उमेदवार निवडून आला पाहिजे या दृष्टीने आतापासूनच पक्षासाठी काम करणे हे प्रत्येक पेडणेतील भाजप कार्यकर्त्यांचे कर्तव्य आहे.
एकेकाळी पक्षाचे झेंडे आणि बॅनर लावणारा आपण कार्यकर्ता आज पक्षाने योग्य ती दखल घेऊन मला या पदापर्यंत पोहोचवले त्याबद्दल आमदार प्रवीण आर्लेकर, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे तसेच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि पेडण्यातील भाजप कार्यकर्त्यांचा मी ऋणी राहीन._सिद्धेश पेडणेकर, अध्यक्ष, पेडणे भाजप.