फोंडा : गव्याची धडक बसून स्कूटरचालक किरकोळ जखमी

स्कुटरचे मोठे नुकसान

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
06th January, 03:31 pm
फोंडा : गव्याची धडक बसून स्कूटरचालक किरकोळ जखमी

फोंडा : पेटके -धारबांदोडा येथे  सोमवारी सकाळी ८. १५ वाजण्याच्या सुमारास अचानक राष्ट्रीय मार्गावर आलेल्या गव्याला स्कुटरची धडक बसून  स्कुटर चालक किरकोळ जखमी झाला. 

प्राप्त माहितीनुसार सोमवारी सकाळी उसगावहुन मोले येथे जात असताना पेटके येथे अचानक रस्त्यावर गवा प्रकटला. त्यावेळी स्कुटर चालकाला धडक चुकविण्याची संधी मिळाली नाही. स्कुटरची धडक गव्याला बसल्याने  चालक किरकोळ जखमी झाला.  जखमी स्कुटर चालकावर पिळये आरोग्य केंद्रात उपचार करून घरी पाठविण्यात आले. यासंबधी पोलीस तक्रार करण्यात आली नाही. गव्याला धडक दिल्याने स्कुटरचे मोठे नुकसान झाले आहे. 

पेटके येथे राष्ट्रीय महामार्गांवर वारंवार गवे अचानक येत असल्याने अधून मधून दुचाकी चालक पडून जखमी होतात. वाहन चालकांना सावध करण्यासाठी वन खात्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी फलक लावण्याची मागणी वाहन चालक करीत आहे.  


हेही वाचा