पणजी : दोन्ही जिल्हाध्यक्षांच्या निवडीनंतरच होणार भाजप प्रदेशाध्यक्षाची निवड

कोअर समितीच्या बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी दिली माहिती

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
06th January, 04:15 pm
पणजी : दोन्ही जिल्हाध्यक्षांच्या निवडीनंतरच होणार भाजप प्रदेशाध्यक्षाची निवड

पणजीः ११ जानेवारी रोजी उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्हाध्यक्षांची निवड झाल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्षाच्या निवडीसाठी तरीक ठरवण्यात येईल अशी माहिती प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी कोअर समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांना माहिती दिली. 

आज पणजीत भाजप गोवा प्रदेश कार्यालयात भाजपच्या कोअर समितीची बैठक पार पडली. निवडणूक प्रक्रियेसाठी भाजप खासदार आणि सरचिटणीस अरुण सिंह यांची निवड झाली आहे. त्यांनी नुकत्याच पार पडलेल्या बूथ आणि लवकरच होऊ घातलेल्या जिल्हाध्यक्ष निवडणूकीचा आढावा घेतला. दरम्यान सदर बैठकीस मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेत तानावडे, मंत्री-आमदार आणि पदाधिकारी हजर होते.  

प्रदेश भाजपच्या दोन्ही जिल्हाध्यक्षपदांसाठी १० जानेवारीपर्यंत अर्ज भरता येणार. ११ रोजी जिल्हाध्यक्षांची निवड होणार. त्यानंतर प्रदेशाध्यक्षपदासाठीची प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती बैठकीनंतर तानावडे यांनी दिली. सगळ्या प्रक्रिया पार पडल्यानंतर अध्यक्षपदासाठी होणारी ही निवडणुक बिनविरोध होईल.  दोन्ही जिल्हाध्यक्ष निवडून आल्यानंतरच नवीन प्रदेशाध्यक्षपदाच्या तारखा जारी केल्या जातील. 

उतर गोवा जिल्हाध्यक्ष पदासाठी दयानंद कार्बोटकार, रुपेश कामत आणि राजसिंह राणे यांचे नाव पुढे आहे. तर दक्षिण गोव्यातून प्रभाकर गावकर, दीपक नाईक आणि शर्मद पै रायतूरकर यांचे नाव पुढे आहे. कमीतकमी तीन नावे केंद्राकडे पाठवली जाणार व यातून एक नाव निश्चित केले जाणार अशी माहिती तानावडे यांनी दिली. दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी इच्छूक असलेल्या नरेंद्र सावईकर, दयानंद मांद्रेकर, दिलीप परूळेकर, बाबू कवळेकर, दयानंद सोपटे, दामू नाईक आणि गोविंद पर्वतकर यांच्याशी राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंग यांनी चर्चा केली आहे. १५ जानेवारीपर्यंत भाजपला नवा प्रदेशाध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे.


हेही वाचा