सनबर्नला सशर्त मंजुरी

स्थगिती देण्याला उच्च न्यायालयाचा नकार


21 hours ago
सनबर्नला सशर्त मंजुरी

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने सनबर्न महोत्सवाला सशर्त परवानगी दिल्याने धारगळ येथील सनबर्न महोत्सव आयोजनाचा मार्ग मोकळा झाला आहे. धारगळ येथे २८ ते ३० डिसेंबर दरम्यान हा महोत्सव होणार आहे. सनबर्न महोत्सवाला स्थगिती देण्याला न्यायालयाने नकार दिला. ध्वनिप्रदूषण, वाहतूक व्यवस्थापनसह अन्य नियमांचे पालन करण्याची जबाबदारी आयोजक तसेच सरकारची राहणार आहे.
धारगळ-पेडणे येथे सनबर्न महोत्सवाला धारगळ पंचायतीने ‘ना हरकत’ दाखला दिला आहे. धारगळच्या ग्रामसभेत सनबर्न महोत्सवाला विरोध करण्याचा ठराव संमत झाला होता. या ठरावाला अतिरिक्त पंचायत संचालकांनी १८ डिसेंबरपर्यंत स्थगिती दिली होती. या सर्व गोष्टी सुनावणीवेळी उच्च न्यायालयासमोर मांडण्यात आल्या. सनबर्न महोत्सवाच्या विरोधात महेश प्रभूदेसाईंसह १७ जणांनी जनहित याचिका दाखल केली होती. तसेच भरत बागकर यांनी जनहित याचिकाही दाखल केली होती. या याचिकांवर शुक्रवारी सुनावणी झाली.