व्हाट्सऍपसारख्या सोशल मीडियामुळे जरी एकमेकांशी संवाद साधणे, विचार किंवा डेटा ट्रान्सफर करणे सोपे झाले असले तरी नाण्याची दुसरी बाजू म्हणून आपण या इन्स्टंट मेसेजिंग ऍपमध्ये हकिंग तसेच सायबर गुन्ह्यांच्या संख्येत वाढ मात्र बरीच झालेली दिसतेय.
काही दिवसांपूर्वीची गोष्ट, माझ्या मैत्रिणीची पोस्ट फेसबुकवर दिसली - ‘माझा व्हाट्सऍप एकाउंट हॅक झाला असून माझ्या नावाने जर कुणी पैसे मागणारा मेसेज केला असेल तर ती मी नव्हे याची कृपया नोंद घ्यावी.’ तसेच स्वत:चा हल्लीच व्यवसाय सुरु केलेल्या मित्रानेही अशी पोस्ट केली. दोघांचेही व्हाट्सऍप एकाउंट हॅक झाले होते आणि दोघांचीही कारणे वेगवेगळी होती. मैत्रिणीने म्हणे तिला तिच्या संपर्कातील जवळच्या एका व्यक्तीने तिच्या मोबाईलवर आलेला ओटीपी विचारला आणि हिने दिला. दुसऱ्याचं कारण होतं ते म्हणजे, त्याला एक सरकारी योजनेसाठी रेजिस्टर व्हा अश्या संदर्भाचा एक मेसेज आलेला आणि त्यातल्या लिंकवर याने क्लिक केलेले.
अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मूलभूत गरजांमध्ये हल्ली अजून एक गोष्ट अॅड करावी लागतेय
ती म्हणजे व्हाट्सऍप. व्हाट्सऍपसारख्या इन्स्टंट मेसेजिंग ऍप्सच्या वाढत्या वापरामुळे वेगवेगळ्या क्लूप्त्यांनी हॅकर्स आपल्या वैयक्तिक डेटामध्ये प्रवेश करत आहेत. आणि असा जेव्हा आपल्या ऑनलाइन अकाऊंटवर अटॅक होतो तेव्हा आपले खाजगी फोटो, संपर्क, बँक डिटेल्स अश्या बर्याच आपल्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या गोष्टी धोक्यात येतात. हल्ली आपली प्रत्येक महत्त्वाची माहिती ऑनलाइन पद्धतीने आपण मोबाइल किंवा इतर प्लॅटफॉर्मवर ठेवत असतो त्यामुळे हा धोका टाळण्यासाठी आपण हॅकर्सवर बारीक लक्ष ठेवणे गरजेचे आहे. काही वेगळी चिन्हे व्हाट्सऍप वापरण्यात दिसू लागली की आपण आपला अकाऊंट हॅक झाल्याचे ओळखू शकतो. जाणून घेऊयात ही कोणती चिन्हे आहेत.
- अनोळखी व्यक्तींशी चॅट होत असेल : जर आपल्या नकळत कुणीतरी अनोळखी व्यक्ती आपल्या खात्यातून चॅट करत असेल तर समजून जावे की आपला व्हाट्सऍप अकाऊंट हॅक झाला आहे.
- लॉग इन करण्यात व्यत्यय : जर आपल्या स्वत:च्या व्हाट्सऍप अकाऊंटमध्ये लॉग इन करण्यात काही व्यत्यय येत असेल किंवा कित्येक प्रयत्नांनीसुद्धा लॉग इन होत नसेल तर आपला व्हाट्सऍप हॅकर्सच्या तावडीत सापडला आहे.
- वारंवार व्हेरिफिकेशन कोड येत असेल : जर व्हाट्सऍपकडून वारंवार व्हेरिफिकेशन कोड येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका कारण याचे कारण कुणीतरी आपला अकाऊंट हॅक केला आहे असा होऊ शकतो.
जर तुमचे व्हॉट्सअॅप अकाउंट हॅक झाले असेल तर लगेच व्हॉट्सअॅप हेल्पलाइनवर संपर्क साधा. तुमचे व्हॉट्सअॅप अकाउंट हॅक होण्याची चिन्हे आढळल्यास तुम्हाला अलर्ट केले जाईल. सतर्क राहून तुम्ही तुमचा पर्सनल डेटा सुरक्षित ठेवू शकता.
व्हाट्सऍप हॅकर्सपासून सावधान कसे राहाल?