शिक्षण : ३० जणांची उच्च शिक्षणासाठी मनोहर पर्रीकर स्कॉलर्स म्हणून निवड

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
6 hours ago
शिक्षण : ३० जणांची उच्च शिक्षणासाठी मनोहर पर्रीकर स्कॉलर्स म्हणून निवड

पणजी : २०२३-२४ वर्षासाठी मनोहर पर्रिकर गोवा स्कॉलरशिप योजना,२०१८ अंतर्गत गोव्यातील ३० विद्यार्थ्यांची  उच्च शिक्षणासाठी मनोहर पर्रीकर स्कॉलर्स म्हणून निवड करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती प्रदान केली जाते. गोव्यातील तरुण प्रतिभावान विद्यार्थ्यांना भारत आणि परदेशातील प्रतिष्ठित विद्यापीठे आणि उच्च शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेण्यासाठी आर्थिक पाठबळ देऊन प्रोत्साहन देणे हा या योजनेचा उद्देश  आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गोव्यातील सुमारे २११ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. या अर्जांमधून छाननी समितीने ३० पात्र विद्यार्थ्यांची निवड केली. या समितीत विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींचा समावेश होता.  

ज्या ३० विद्यार्थ्यांची या योजनेसाठी निवड झालेली आहे ते एरोस्पेस, न्युरोसायन्स, बायो-मेडिकल इंजिनियरिंग, ईलेक्ट्रिकल इंजिनियरिंग, रसायन शास्त्र, रोबोटिक्स, बायो-सायन्स, कॉम्प्युटर सायन्स, फिजिकल सायन्स, फायनान्स, स्ट्रेटेजिक कोम्यूनिकेशन, मेडिकल सायन्स, फार्माकोलॉजी, बायोलॉजिकल सायन्स, व्यवस्थापन, स्पोर्ट्स फिजिओलॉजी इत्यादि क्षेत्रात शिक्षण घेत आहेत. 

खालील विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणासाठी मनोहर पर्रीकर स्कॉलर्स म्हणून निवड करण्यात आली आहे. 














हेही वाचा