बार्देश : म्हापशातील डांगी कॉलनी येथील घराला आग, १ लाखांचे नुकसान

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
20th December, 04:21 pm
बार्देश : म्हापशातील डांगी कॉलनी येथील घराला आग, १ लाखांचे नुकसान
  •  म्हापसा :  डांगी कॉलनी, म्हापसा येथील रशिका तेंडुलकर यांच्या घराला लागलेल्या आगीत दोन भाड्याच्या खोल्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. या दुर्घटनेत १  लाखांचे नुकसान झाले. प्राप्त माहितीनुसार ही घटना गुरूवारी १९ रोजी रात्री ९.४५ च्या सुमारास घडली. तेंडुलकर यांनी आपल्या घराच्या मागील बाजूच्या दोन खोल्यांमध्ये भाडेकरू ठेवले होते. घटनेच्या पुर्वी येथे राहणारे कुटुंबीय आपल्या एका नातेवाईकांकडे वाढदिवसानिमित्त गेले होते. त्यानंतर ही आग लागली.      

आगीत खोल्यांतील सर्व सामान जळून खाक झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी सुरूवातील तीन गॅस सिलिंडर प्रसंगावधाने बाहेर काढले. यातील दोन सिलिंडरना आग लागली होती. त्यानंतर जवानांनी पाण्याचा फवारा मारून आग नियंत्रणात आणली. त्यामुळे घराची इतर मालमत्ता आगीपासून वाचली. 

म्हापसा अग्निशमन दलाचे हवालदार सुरज शेटगावकर, जयेश कळंगुटकर, जितेंद्र नाईक अशोक वळवईकर, आकाश कळंगुटकर, तसेच पर्वरी दलाचे हवालदार सलिम शेख, ईप्रिमो डायस, विकास मोरजकर, महेंद्र नाईक, रोहन नाईक व आर. आर. सावंत या जवानांनी ही आग विझवली. म्हापसा पोलीस हवालदार उल्हास गावकर यानी घटनेचा पंचनामा केला.   

हेही वाचा