सत्तरी : भूमिका देवस्थान वाद : पर्येत 'रास्ता रोको' कायम

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
10 hours ago
सत्तरी :  भूमिका देवस्थान वाद :  पर्येत 'रास्ता रोको' कायम

पर्ये : भूमिका देवस्थान २४ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश दिल्यामुळे २१ रोजी धार्मिक सप्ताह व २२ रोजी गवळण काला होणार नसल्याचे निश्चित झाले होते. यानंतर यास विरोध म्हणून माजिक महाजन गटाच्या लोकांनी  शुक्रवारी रात्री उशिरा देवस्थानासमोर जमून महामार्ग रोखण्याचा प्रयत्न केला. दरम्यान काल रात्रीपासून रोखून धरलेला महामार्ग अजूनही बंदच असून गोवा-बेळगाव वाहतूक होंडामार्गे वळवण्यात आली आहे. वादावर तोडगा काढण्यासाठी वाळपई उपजिल्हाकाऱ्यांकडून प्रयत्न सुरूच आहेत. 

माजिक महाजन गटाचे लोक संतप्त झाल्याने त्यांनी सायंकाळी मंदिराच्या आवारात जमून आक्रमकपणे आपल्या मागण्या प्रशासनासमोर ठेवल्या होत्या. मंदिर बंद ठेवण्याच्या आदेशासह चौघांविरोधात नोंद केलेले गुन्हे मागे घ्यावे, अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली होती.

दरम्यान मंदिर २४ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आल्याने तसेच मंदिराच्या आवारात पोलीस फौजफाटा तैनात केल्यामुळे संतापलेल्या लोकांनी पोलिसांवर दगडफेक केली. सुमारे ५०० लोकांच्या जमावापुढे पोलिसांचा टिकाव काही लागला नाही. एका उपनिरीक्षकासह काही पोलिसांना इजा झाल्यामुळे पोलिसांनी काढता पाय घेत सुरक्षित स्थळी आसरा घेतला. जमावावर नियंत्रण ठेवण्यासाठी रात्री उशिरा आणखी पोलीस कुमक मागविण्यात आली होती.


( बातमी अपडेट होत आहे.)

हेही वाचा