मुंबई : एनसीबीची ड्रग्स विरोधात धडक कारवाई : दोन वेगवेगळ्या प्रकरणांत दोघांना अटक

नाताळ-नवीन वर्षाचे औचित्य साधून तरुणाईला आकर्षित करण्यासाठी व मागणीचा पुरवठा करण्यासाठी देशभरातील ड्रग्स तस्कर विविध क्लूप्त्या लढवत आहेत.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
20th December, 05:59 pm
मुंबई : एनसीबीची ड्रग्स विरोधात धडक कारवाई : दोन वेगवेगळ्या प्रकरणांत दोघांना अटक

मुंबई : देशभरात नाताळ आणि नववर्षाच्या अनुषंगाने विविध ठिकाणी पार्ट्या आणि कॉन्सर्ट आयोजित केल्या जातात. तरुण पिढीला आकर्षित करण्यासाठी अशा ठिकाणी हार्ड ड्रग्सचा पुरवठा सर्रास केला जातो. दरम्यान मादक पदार्थांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी ड्रग्स तस्कर नेहमीच काहीतरी नवीन शक्कल लढवतात. दरम्यान ड्रग्स तस्करी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या अशाच २ तस्करांच्या मुसक्या मुंबई पोलिसांच्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने आवळल्या आहेत. 


Na rave party ve Francii se celou noc rvali návštěvníci s kočovníky,  vzduchem létaly kameny - Novinky


पहिले प्रकरण मुंबईतीलच आहे. डार्क वेबच्या माध्यमातून चालणाऱ्या ड्रग्सच्या व्यवसायावर प्रगत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पाळत ठेऊन असलेल्या एनसीबीच्या अधिकाऱ्यांना एक इनपुट मिळाले व यावर त्यांच्या एका पथकाने धडक कारवाई केली.  एका पार्सलच्या माध्यमातून मुंबईत हार्ड ड्रग्सची एक खेप येणार असल्याची ही माहिती होती. या पथकाने मुंबईतील एका पोस्ट ऑफिसमधून हे पार्सल हस्तगत केले.  दरम्यान ९ डिसेंबर रोजी पार्सल हाती आल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून सदर खेप मागवणाऱ्याचा माग काढला व संशयितास ताब्यात घेतले. 




सदर व्यक्तीच्या घराची झडती घेतली असता  तपास पथकाला बेडरूममध्ये हायड्रोफोनिक गांजाची लागवड करण्यात आल्याचे आढळून आले. चौकशीदरम्यान, या व्यक्तीने आपण डार्क वेबच्या माध्यमातून हार्ड ड्रग्स मागवल्याचे कबूल केले.  चौकशीनंतर त्यास अमली पदार्थविरोधी कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून रीतसर अटक करण्यात आली. या व्यक्तीकडून डार्क वेबच्या माध्यमातून मागवण्यात आलेल्या पार्सलमधून १.२३ ग्रॅम मॅस्कलिन आणि ४८९ ग्रॅम हायड्रोफोनिक गांजा जप्त करण्यात आला. या एकूण मालाची आंतरराष्ट्रीय बाजारतील किमत सुमारे २० लाख रुपये आहे. याप्रकरणाची पुढील चौकशी सुरू आहे. 


Peyote Street Names


अन्य एका प्रकरणात समोर आलेल्या माहितीनुसार, थायलंडहून विमानामार्गे मुंबईत होणाऱ्या ड्रग्स तस्करीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. नाताळ आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्टवर असलेल्या ड्रग्स विरोधी यंत्रणेला मुंबई विमानतळावर बँकॉक टू मुंबई प्रवास करणाऱ्या थाय एअरवेजच्या फ्लाइट क्र. टीजी-३१७मधून आलेले एक संशयित पॅकेज १७ डिसेंबर रोजी दृष्टीस पडले. सदर पॅकेज उघडून यातील पदार्थाची रसायनिक चाचणी केली असता यात हायब्रिड स्ट्रेनचा गांजा असल्याचे आढळून आले. याप्रकरणी खोलवर तपास केला असता याची पाळेमुळे कोल्हापूर पर्यंत पसरल्याचे समोर आले. 




नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी एकटवलेल्या माहितीच्या आधारे कोल्हापुरातील हे पार्सल मागवणाऱ्या व्यक्तीस ताब्यात घेत १९ डिसेंबर रोजी त्याची चौकशी केली. ठोस पुरावे हाती आल्यानंतर त्याच्यावर अमलीपदार्थ विरोधी कायद्याच्या कलमान्वये गुन्हा नोंदवून रीतसर अटक करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, सदर पॅकेजमधून तब्बल १३ किलोचा हायब्रिड स्ट्रेनचा गांजा हस्तगत करण्यात आला आहे. याची किमत आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे १५ कोटी रुपये इतकी आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.  


Indica vs. Sativa vs. Hybrid – Apollo

बातमी अपडेट होत आहे. 


हेही वाचा