अमित नाईकची न्यायालयीन कोठडीत रवानगी

सिद्दिकी (सुलेमान) खान पलायन प्रकरण

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
18th December, 11:48 pm
अमित नाईकची न्यायालयीन कोठडीत रवानगी

म्हापसा : सिद्दिकी उर्फ सुलेमान खान पलायन प्रकरणातील संशयित आरोपी अमित नाईक या बडतर्फ आयआरबी कॉन्स्टेबलची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. तर, संशयित हजरतसाब बवन्नवार उर्फ हजरत अली (रा. हुबळी) हा सध्या पोलीस कोठडीत आहे.

संशयित अमित नाईक याने रविवार, दि. १५ रोजी जुने गोवे पोलीस कोठडीत फिनाईल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मंगळवारी १७ रोजी त्याला गोमेकॉतून डिस्चार्ज मिळाला होता. पोलिसांनी संशयिताला बुधवारी न्यायालयाने १४ दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. त्यानुसार अमितची रवानगी कोलवाळ कारागृहात करण्यात आली.

दरम्यान, अट्टल गुन्हेगार सिद्दिकीला हुबळीहून पसार होण्यात मदत करणाऱ्या संशयित हजरत अली याला पोलिसांनी १४ रोजी अटक केली होती. तो सध्या पोलीस कोठडीतच असून त्याची चौकशी जुने गोवे पोलीस करीत आहेत.

दरम्यान, सिद्दिकी खानचे पलायन नाट्य शुक्रवार, दि. १३ रोजी घडले होते. संशयित अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. गोवा पोलीस पथक त्याचा हैदराबाद व कर्नाटकमध्ये शोध घेत आहेत. बडतर्फ आयआरबी कॉन्सटेबल अमित नाईक याने सिद्दिकीला एसआयटीच्या पोलीस कोठडीतून पलायन करण्यास मदत केली होती. याप्रकरणी पोलिसांनी संशयित सिद्दिकी, अमित नाईक व हजरत अली यांच्याविरुद्ध भा.न्या. सं.च्या २६०, २६० क, २५३, २४९ क व ६१ कलमान्वये गुन्हा नोंद केला आहे. 

हेही वाचा