खाण खात्याने जप्त केलेल्या रेतीची चोरी

कुळे पोलिसांकडून ट्रक जप्त

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
28th December, 11:56 pm
खाण खात्याने जप्त केलेल्या रेतीची चोरी

फोंडा : बरकटे- मोले येथे २-३ वर्षांपूर्वी खाण खात्याच्या अधिकाऱ्यांनी जप्त केलेली रेतीची चोरी केल्याप्रकरणी कुळे पोलिसांनी गोविंद गावकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रेती चोरी प्रकरणी कुळे पोलिसांनी एक ट्रक जप्त केला आहे. बाबलो गावकर यांनी तक्रार दाखल केल्यानंतर कुळे पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

दि. २५ डिसेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास खाण खात्याने काही वर्षांपूर्वी जप्त केलेली रेतीची वाहतूक करण्यात आली असल्याची तक्रार बाबलो गावकर यांनी कुळे पोलीस स्थानकात दिली होती. खाण खात्याने काही वर्षांपूर्वी रगाडा नदीची बेकायदेशीर रेती उपसा केल्याने कारवाई करून रेती जप्त केली होती. सध्या न्यायालयात प्रकरण प्रलंबित असताना गोविंद गावकर यांनी जेसीबीच्या सहाय्याने ट्रकमधून रेती वाहतूक केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. कुळे पोलिसांनी गुन्हा नोंद करून शनिवारी एक ट्रक जप्त केला आहे. निरीक्षक राघोबा कामत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विभावरी गावकर अधिक तपास करीत आहेत. 

हेही वाचा