कारवार | पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून इसमाची पेट्रोल ओतून हत्या

महिलेच्या पतीसह सहा जणांना पोलिसांकडून अटक

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
27th December, 02:50 pm
कारवार | पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून इसमाची पेट्रोल ओतून हत्या

कारवार : हावेरी जिल्ह्यातल्या हाणगल तालुक्यातील कोप्परसिकोप्प येथे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून एका इसमाची हत्या करण्यात आल्याची घटना गुरुवारी (दि.२६) संध्याकाळच्या सुमारास घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. संबंधित इसमाला वीजेच्या खांबाला बांधून, त्याच्या गळ्यात चप्पलांची माळ घालून आणि अंगावर पेट्रोल ओतून त्याची हत्या केल्याच्या धक्कादायक घटनेने कोप्परसिकोप्प परिसर हादरला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार हत्या झालेल्या व्यक्तीचे शेजारच्या एका विवाहित महिलेशी अनैतिक संबंध होते. घटनेच्या दिवशी सदर इसम त्या महिलेच्या घरातच आढळून आल्याने त्या महिलेच्या पतीसह दहा जणांनी त्याची हत्या केल्याची माहिती मिळाली आहे. तसेच संबंधित महिला आणि कुटुंबातील अन्य काही सदस्यांना देखील जबर मारहाण करण्यात आल्याचे वृत्त हाती आले आहे. जखमींवर हाणगल आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.

हाणगल पोलीस स्थानकात या प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी हाणगल पोलिसांनी महिलेच्या पतीसह सहा जणांना अटक केली असून त्यांच्याविरुद्ध बीएनएस कायद्याच्या कलम १०३(१),७४,१८९(२), १९१(२),१९१(३), ११५(२), ११८(१)३५२, ३५१(२)(३), १२६(२), १३३, १९० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(सविस्तर माहिती अपडेट करत आहोत.)

हेही वाचा