मैत्रिणीला भेटण्यासाठी आलेल्या युवकाला मारहाण

कामुर्ली येथील प्रकार : चारही संशयितांची अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
14 hours ago
मैत्रिणीला भेटण्यासाठी आलेल्या युवकाला मारहाण

पणजी : कामुर्ली येथे मैत्रिणीला भेटण्यासाठी आलेल्या ऋत्विक सावंत (२४) या युवकाला चार जणांच्या टोळक्याने जबर मारहाण केली. या प्रकरणातील चारही संशयितांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे.

श्रेयंश अजित गाड, साईश प्रदीप अणवेकर, गुरूदास अरविंद वायंगणकर व शरद सदाशिव गाड यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर शुक्रवार, दि. २७ रोजी सुनावणी होणार आहे.

ही घटना, २२ डिसेंबर रोजी संध्याकाळी उशीरा घडली होती. ऋत्विक सावंत हा घटनेच्यावेळी कामुर्ली येथे आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी आला होता. यावेळी चार अज्ञातांनी त्याला लाथाबुक्की व दंडुक्याच्या सहाय्याने जबर मारहाण केली. या मारहाणीत रूत्विकचा हात मोडला असून त्याच्यावर इस्पितळात उपचार सुरू आहेत.

जखमी युवकाचे वडील राया सावंत यांच्या तक्रारीच्या आधारे कोलवाळ पोलिसांनी या मारहाण प्रकरणी गुन्हा नोंद केला आहे. 

हेही वाचा