मृत पावलेली व्यक्ती ही भाजपच्या विद्यमान आमदाराचा सख्खा मामाच असल्याने या प्रकरणाला हाय प्रोफाइल वलय मिळाले आहे.
पुणे : भाजपचे पुण्यातील आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचे काही दिवसांपूर्वी अपहरण करून हत्या करण्यात आली होती. त्यांचा मृतदेह घाटात आढळून आला होता. पोलिसांनी विविध अंगांनी तपासचक्रे गतिमान केली होती. मृत पावलेली व्यक्ती ही भाजपच्या विद्यमान आमदाराचा सख्खा मामाच असल्याने या प्रकरणाला हाय प्रोफाइल वलय लाभले.
राजकारण्यांचा दबाव आणि तपास पूर्ण करण्याच्या आव्हानामुळे पोलीस देखील चांगलेच चेपले जात होते. दरम्यान याप्रकरणी आता मोठा खुलासा झाला आहे. शेजाऱ्याशी असलेल्या विवाहबाह्य संबंधाला अडसर ठरत असल्याचे पाहून सतीश वाघ च्या पत्नीनेच ५ लाखांची सुपारी दिल्याचे समोर आले आहे. मोहिनी वाघ असे या महिलेचे नाव आहे.
हा काही चित्रपट नव्हे, ही तर सत्य घटना !
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पूर्ण केला. यवत येथील शिंदवणे घाटात सतीश वाघ यांचा मृतदेह आढळून आला होता. अपहरण करून त्याचा खून करत मृतदेह येथे टाकून देण्यात आला होता. यापकरणी पोलिसांनी सीसीटीव्हीच्या अहदारे चार जणांना ताब्यात घेत अटक केली. पोलीस खाक्या दाखवताच या चौघांनी मुख्य सूत्रधाराचे नाव उघड केले. आतापर्यंत अटक करण्यात आलेल्यांत मोहिनी वाघ (मुख्य सूत्रधार), पवन शर्मा (अपहरणकर्ता), अतिश जाधव (अपहरणकर्ता ) विकास शिंदे (अपहरणकर्ता) अक्षय जवळकर ( सुपारी घेणारा, अपहरणकर्ता आणि प्रियकर) यांचा समावेश आहे.
अक्षय जवळकर हा मोहिनी वाघच्या मुलांचा मित्र. मोहिनी ही ४८ वर्षांची तर अक्षय हा ३२ वर्षांचा आहे. अक्षय आणि मोहिनीचे अनैतिक संबंध असल्याच्या खुलासा झाल्यानंतर २०१६ पासून नवरा बायकोत वाद होत होते. सतीश याआणि अनेकदा यावरुण मोहिनी हिला मारहाण देखील केली होती. या संबंधांना अडसर ठरू नये म्हणून अक्षय आणि मोहिनीने प्लॅन आखला.
अक्षयचे आईवडील सतीश वाघ यांच्या येथे भाड्याच्या खोलीत राहत होते. अक्षयचे पालक वडापावचा गाडा चालवायचे तर वाघ यांचे ब्ल्यूबॅरी नावाचे हॉटेल चालवायचे. वाघ यांचा मुलगा आणि अक्षय एकाच वयाचे असल्याने अक्षयचे त्याच्या घरी येणे जाणे सुरू झाले. दरम्यान २०१३ साली अक्षय २१ वर्षांचा झाल्यानंतर मोहिनी आणि अक्षयमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. अक्षयचे लग्न ठरले व तो दुसरीकडे निघून गेला. लग्नानंतरही हा सिलसिला पुढे हा सिलसिला कायम राहिला. यादरम्यान अनेकदा अक्षयच्या विषयावरून मोहिनी आणि सतीशमध्ये होणारा वाद वाढू लागला. दरम्यान दोघांनी षड्यंत्र रचत शतीक्ष यांचा काटा काढला.
कॉल रेकॉर्डमधून उलगडा
अक्षय जावळकरने या कटात त्याच्या मित्रांनाही सहभागी करून घेतलं. ९ डिसेंबररोजी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या सतीश वाघ यांचे अपहरण करून अवघ्या पंधरा मिनिंटातच त्यांची हत्या करण्यात आली होती. धारदार शस्त्राने तब्ब्ल ७० वार करत तेंचा जीव घेण्यात आला. मात्र हे पैशांसाठी केलेले अपहरण आहे, असा बनाव करण्यात आला. मात्र, पोलिसांनी
अक्षयला अटक केल्यानंतर त्याचे कॉल डिटेल्स तपासले असता त्यात मोहिनीचे नाव वारंवार आढळून आले. अक्षयची पार्शवभूमी तपासली असता अनैतिक संबंधाचा उलगडा झाला व यातूनच हत्येचा खुलासा झाला.