सिंघम अगेन, भूल भुलैया ३ ची बॉक्स ऑफिसनंतर ओटीटीवर टक्कर
आज रोहित शेट्टी-अजय देवगणचा कॉप ड्रामा ‘सिंघम अगेन’ आणि कार्तिक आर्यन स्टारर हॉरर कॉमेडी ‘भूल भुलैया ३’ ओटीटीवर झळकणार आहेत.
भूल भुलैया ३ । नेटफ्लिक्स
बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय केल्यानंतर, कार्तिक आर्यन स्टारर भूल भुलैया ३ आज नेटफ्लिक्सवर प्रीमियरसाठी सज्ज झाला आहे. अनीस बज्मी दिग्दर्शित या चित्रपटात रुहान रंधावा (रूह बाबा) ची कथा पुढे चालू ठेवते. ज्याला मंजुलिका असल्याचा दावा करणाऱ्या दोन सूडबुद्धीचा सामना करावा लागतो. हॉरर कॉमेडीमध्ये माधुरी दीक्षित, तृप्ती डिमरी आणि विद्या बालन यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.
सिंघम अगेन । अॅमेझॉन प्राईम व्हिडिओ
सिंघम अगेन हा रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्समधील पाचवा प्रोजेक्ट आहे आणि सिंघम रिटर्न्स (२०१४) चा सिक्वेल आहे. बाजीराव सिंघमच्या पत्नीचे अपहरण डेंजर लंकेने केल असून तिची सुटका करण्यासाठी तो आपल्य सहकाऱ्यांची मदत घेतो. हा चित्रपट रामायणातून प्रेरणा घेऊन बनविण्यात आला आहे. या चित्रपटात अजय देवगण, करीना कपूर खान, अक्षय कुमार, अर्जुन कपूर, रणवीर सिंग, अक्षय कुमार, दीपिका पदुकोण आणि टायगर श्रॉफ यांच्यासह अनेक कलाकारांचा समावेश आहे.
युवर फाॅल्ट । अॅमेझॉन प्राईम व्हिडिओ
युवर फॉल्ट हा एक स्पॅनिश रोमँटिक चित्रपट आहे, जो दोन तरुण व्यक्तींच्या जीवनाचा वेध घेतो. ज्यांचे बंध त्यांच्या पालकांनी त्यांना वेगळे करण्याचा प्रयत्न करूनही दृढ होत जातात. तथापि, जेव्हा ते कॉलेज सुरू करतात आणि व्यावसायिक जगात प्रवेश करतात तेव्हा त्यांना नवीन आव्हानांचा सामना करावा लागतो.
डॉक्टर्स । जीओ सिनेमा
मुंबईतील एलिझाबेथ ब्लॅकवेल मेडिकल सेंटरमध्ये चित्रीत केलेला हा वैद्यकीय ड्रामा डॉ. नित्या वासू यांच्या भोवती फिरतो. या मालिकेतील कलाकारांमध्ये शरद केळकर, हरलीन सेठी, विराफ पटेल, आमिर अली आणि विवान शाह यांचा समावेश आहे.
खोज: परछायीयों के उस पार । झी ५
हा सायकॉलॉजिकल सस्पेन्स थ्रिलर चित्रपट वेदच्या भोवती फिरतो, जो मीरा नावाच्या आपल्या हरवलेल्या पत्नीला शोधण्यासाठी निघतो. या मालिकेत शरीब हाश्मी आणि अनुप्रिया गोयंका यांच्या भूमिका आहेत.
मदर्स इन्स्टिंक्ट । लायन्सगेट प्ले गेट
हा चित्रपड ऑलिव्हियर मॅसेट-डेपास या २०१८ मधील फ्रेंच चित्रपटाचा रिमेक, मदर्स इन्स्टिंक्ट दोन पारंपारिक गृहिणी, शेजारी आणि जिवलग मित्र ॲलिस आणि सेलीन यांची कथा सांगताे. ज्यांचे परिपूर्ण जीवन एका दुःखद अपघाताने हादरले आहे. पुढील गोष्टी म्हणजे अपराधीपणा, विडंबन आणि संशय जे त्यांच्या बंधनाची परीक्षा घेतात. बेनोइट डेलहोम दिग्दर्शित या चित्रपटात जेसिका चेस्टेन आणि ॲन हॅथवे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
टेक्का । होइचोई
हा सृजित मुखर्जी दिग्दर्शित ॲक्शन-पॅक चित्रपट आहे. जो एका सुरक्षा रक्षकाभोवती फिरतो. जो आपली नोकरी गमावल्यानंतर एका मुलीचे अपहरण करतो. अपहरण झालेल्या मुलीची आई जेव्हा सुरक्षा रक्षकाच्याच मुलाला ओलीस ठेवते, तेव्हा परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होते. हा चित्रपट शेवटपर्यंत तुम्हाला सीटवर बांधून ठेवेल.