‘मिसेस देशपांडे’ ते ‘थामा’ या आठवड्यात ओटीटीवर पाहा धमाकेदार मनोरंजन

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
18th December, 11:43 pm
‘मिसेस देशपांडे’ ते ‘थामा’ या आठवड्यात ओटीटीवर पाहा धमाकेदार मनोरंजन

ओटीटी प्रेक्षकांसाठी हा आठवडा खास ठरणार आहे. १५ ते २१ डिसेंबरदरम्यान कॉमेडी, रोमँटिक, थ्रिलर आणि क्राईम अशा विविध जॉनरमधील एकापेक्षा एक दर्जेदार सीरिज आणि चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होत आहेत. माधुरी दीक्षितची बहुचर्चित सीरिज ‘मिसेस देशपांडे’ ते आयुष्मान खुराना–रश्मिका मंदाना यांचा सुपरहिट चित्रपट ‘थामा’ यांचा यामध्ये समावेश आहे.

 
‘मिसेस देशपांडे’ । जिओ हॉटस्टार
माधुरी दीक्षित प्रमुख भूमिकेत असलेली ही सीरिज गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. साधीसुधी गृहिणी वाटणारी ‘मिसेस देशपांडे’ प्रत्यक्षात अनेक रहस्ये दडवून ठेवते. क्राईम आणि थ्रिलरचा तडका असलेल्या या सीरिजमध्ये माधुरीसोबत सिद्धार्थ चांदेकरही महत्त्वाच्या भूमिकेत आहे.

 
‘थामा’ । अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ
आयुष्मान खुराना आणि रश्मिका मंदाना यांचा कॉमेडी-थ्रिलर चित्रपट थिएटरमध्ये हिट ठरला. जर तुम्ही हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहू शकला नसाल, तर आता घरबसल्या पाहण्याची संधी आहे.

 
‘एक दिवाने की दिवानीयत’ । नेटफ्लिक्स
हर्षवर्धन राणे आणि सोनम बाजवा यांच्या अभिनयाने सजलेला हा इंटेन्स ड्रामा चित्रपट थिएटरमध्ये चांगलाच गाजला. मिलाप जवेरी दिग्दर्शित या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर आता तो ओटीटीवर येत आहे.

 
‘रात अकेली है’ । नेटफ्लिक्स
हनी त्रेहान दिग्दर्शित या थ्रिलरमध्ये नवाजुद्दीन सिद्दिकी, राधिका आपटे आणि श्वेता त्रिपाठी यांच्या भूमिका आहेत. एका नवविवाहित घरमालकाच्या खुनाच्या तपासाभोवती फिरणारी ही कथा प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवते.

 
‘द ग्रेट इंडियन कपिल शो : सीझन ४’ । नेटफ्लिक्स
प्रेक्षकांचा लाडका कॉमेडी रिअॅलिटी शो पुन्हा एकदा मनोरंजनाची मेजवानी घेऊन येत आहे. बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रिटींच्या धमाल गप्पा आणि कपिल शर्माची खुमासदार कॉमेडी पुन्हा पाहायला मिळणार आहे.

 
फोर मोअर शॉट्स प्लीज! : सीझन ४ । अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ
लोकप्रिय वेबसीरिज ‘फोर मोअर शॉट्स प्लीज!’चा चौथा आणि अंतिम सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सिद्धी, दामिनी, अंजना आणि उमंग या चार मैत्रिणींच्या आयुष्यातील नवा टप्पा या सीझनमध्ये दाखवण्यात आला आहे. ‘मदर ऑफ ऑल पॅक्ट्स’ अंतर्गत सहा महिन्यांत आयुष्यात बदल घडवण्याचे आव्हान या चौघींना पेलावे लागते. या प्रवासात त्या अस्वस्थ करणाऱ्या सत्यांचा सामना करतात आणि स्वतःला अधिक चांगले बनवण्याचा प्रयत्न करतात. या रोमँटिक कॉमेडी-ड्रामामध्ये सायनी गुप्ता, किर्ती कुल्हारी, बानी जे आणि मानवी गगरू पुन्हा एकदा प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत.

 
द ग्रेट फ्लड । नेटफ्लिक्स
हा दक्षिण कोरियन साय-फाय आपत्तीपट प्रेक्षकांना थरारक अनुभव देणारा आहे. किम दा-मी, पार्क हे-सू आणि क्वॉन यून-सॉंग यांच्या प्रमुख भूमिका आहेत. कथानक एका एआय संशोधिकेभोवती फिरते, जिच्याकडे मानवजातीच्या भवितव्याची गुरुकिल्ली आहे. ती आणि तिचा लहान मुलगा एका अपार्टमेंटमध्ये अडकतात, जेव्हा प्रलयंकारी जागतिक पूर संपूर्ण पृथ्वीला गिळंकृत करतो. या परिस्थितीत त्यांचा जिवंत राहण्यासाठीचा संघर्ष कथेत केंद्रस्थानी आहे.

 
ह्युमन स्पेसिमेन्स । अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ
प्रसिद्ध लेखिका काने मिनातो यांच्या कादंबरीवर आधारित ही जपानी सायकोलॉजिकल थ्रिलर सीरिज आहे. या कथेत प्रोफेसर शिरो साकाकी नावाचा फुलपाखरांचा संशोधक सहा लहान मुलांना ‘मानवी नमुने’ बनवतो. त्यामध्ये त्याचा स्वत:चा मुलगाही असतो. ही सीरिज मानवी मनातील अंधाऱ्या प्रवृत्ती, क्रूरता आणि नैतिकतेच्या सीमांवर खोलवर भाष्य करते.

 
नयनम । झी ५
‘नयनम’ ही एक प्रभावी मानसिक साय-फाय थ्रिलर सीरिज आहे. कथा एका नेत्रतज्ज्ञ डॉक्टरभोवती फिरते, जो गरजू रुग्णांसाठी डोळ्यांचा दवाखाना चालवतो. मात्र, त्याच वेळी तो अशा प्रयोगांमध्ये गुंतलेला असतो, जे वास्तव आणि महत्त्वाकांक्षा यांच्यातील सीमारेषा पुसून टाकतात. मानवी लालसा, विज्ञान आणि नैतिकता यांचा संघर्ष या सीरिजमध्ये प्रभावीपणे मांडण्यात आला आहे.

हेही वाचा