पोलिसांच्या तपासात माहिती खोटी असल्याचे उघड

मुंबई : मुंबईत (Mumbai) ३६ तासांत १२ मुले बेपत्ता झाल्याच्या माहितीने एकच खळबळ माजली व धावपळही झाली. ८ ते १५ वर्षे वयोगटातील आठ मुलींसह १२ मुले (children) बेपत्ता (missing) झाल्याची माहिती सर्वत्र पसरली. त्यात दादरच्या शिवाजी पार्कमधून चार मुले, अॅंटाप हिलमधून २, बांगूर नगर व मानखुर्द भागातून तीन मुले बेपत्ता झाल्याचा या माहितीत समावेश होता. यासंदर्भात अपहरणाचे गुन्हेही दाखल करण्यात आले व संघटीत तस्करी नेटवर्कचा सहभाग असल्याचे सूचित करण्यात आले होते.
एकूण या माहितीमुळे मुंबई पोलीस (Mumbai Police) सतर्क बनले. त्यांनी कसून तपास सुरू केला असता ही माहिती खोटी असल्याचे दिसून आले. त्यानंतर मुंबई पोलिसांनी सोशल मिडियावर पोस्ट करून ही माहिती खोटी असल्याचे स्पष्ट केले. एकूण हा प्रकार खोटा असल्याचे उघड झाल्यावर पोलिसांनीही सुटकारा घेतला.
दरम्यान, मुले बेपत्ता असल्याचे हे वृत्त सर्वत्र झपाट्याने पसरले. अनेक माध्यमांनीही या माहितीची खातरजमा न करता संकेतस्थळ व वाहिन्यांवर दाखवली. त्यामुळे नागरिकांमध्येही भीती निर्माण झाली.