रॉटरडॅम चित्रपट महोत्सवात ‘पुर्तुगीज मॅन ओ’ वॉर’ कथानकाची निवड

रिधम जानवे, मायाभूषण नागवेकर यांचे लेखन

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
just now
रॉटरडॅम चित्रपट महोत्सवात ‘पुर्तुगीज मॅन ओ’ वॉर’ कथानकाची निवड

पणजी : पुढील वर्षी होणाऱ्या २०२६च्या रॉटरडॅम आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी ‘पुर्तुगीज मॅन ओ’ वॉर’ (Portuguese Man O' War) या चित्रपट कथानकाची निवड झाली आहे. रिधम जानवे (Ridham Janve) आणि गोमंतकीय पत्रकार मायाभूषण नागवेकर (Mayabhushan Nagvenkar) यांनी हे कथानक लिहिले आहे. बॉम्बे बर्लिन फिल्म प्रॉडक्शन आणि द फिल्म कॅफे या चित्रपटाची निर्मिती करतील.      

१५ व्या शतकात एक प्रवासी संशोधक गोव्याच्या एका बेटावर पोहोचतो आणि वसाहतवाद सुरू होतो. या घटनेवर आधारित हे कथानक आहे.      


कथानक लेखक रिधम जानवे हे इतिहास, अाध्यात्मिक आणि पुराण कथांवर चित्रपट करतात. त्यांचे ‘द गोल्ड लॅडन शीप’ आणि ‘सेक्रेड माऊंटन’ हे प्रसिद्ध चित्रपट आहेत. 


मायाभूषण नागवेकर हे पत्रकार आहेत. त्यांनी अनेक वृत्तपत्रांसाठी लेखन केले आहे. ‘अॅन एक्स्ट्राऑर्डिनरी लाईफ : अ बायोग्राफी ऑफ मनोहर पर्रीकर’ आणि ‘मर्डर इन द सिटी : डेडली क्राईम्स थॅट रॉक्ड अ नेशन’ ही त्यांची प्रसिद्ध पुस्तके आहेत.

हेही वाचा