बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा चौथा कसोटी सामना मेलबर्नच्या मैदानावर खेळला
नवी दिल्लीः भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे दिल्लीतील एम्स रुग्णालयात वयाच्या 92व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे अवघ्या देशावर शोककळा पसरली असून विविध स्तरातून त्यांना वाहिली जात आहे. भारतीय क्रिकेट संघाने देखील मेलबर्नच्या मैदानातून त्यांनी श्रद्धांजली अपर्ण केली आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी भारतीय संघ बॉक्सिंग डे सामन्याच्या दुसऱ्या दिवशी काळी पट्टी बांधून मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला.
सध्या भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा चौथा कसोटी सामना मेलबर्नच्या मैदानावर खेळला जात आहे. या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघातील खेळाडू हातावर काळी पट्टी बांधून मैदानावर उतरल्याचे पाहायला मिळाले.
क्रिकेटपटूंनी ट्विट करत वाहिली श्रद्धांजलीः-
अनेक क्रिकेटपटूंनी ट्विट करत मनमोहन सिंह यांनी श्रद्धांजली अर्पण केली. माजी क्रिकेटपटू हरभजन सिंह, विरेंद्र सेहवाग आणि युवराज सिंह यांनी ट्विटरवरून त्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. ‘डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाची बातमी ऐकून दु:ख झाले. ते भारताच्या प्रगतीसाठी अथक परिश्रम करणारे एक दूरदर्शी नेते आणि खरे राजकारणी होते. त्यांची बुद्धी आणि नम्रता नेहमीच स्मरणात राहील. त्यांच्या प्रियजनांप्रती माझ्या संवेदना’, असे ट्विट करत युवराज सिंहने दुःख व्यक्त केले.