फोंडा : फर्मागुडी येथे शनिवारी संध्याकाळी कार व स्कुटर यांच्यात झालेल्या अपघातात शुभम नागवेकर (वाडी- तळावली) हा स्कुटर चालक जखमी झाला. त्याला त्वरित १०८ रुग्णवाहिकेतून उपजिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले.
फर्मागुडी येथील गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या गेटजवळ शनिवारी संध्याकाळी कार व स्कुटर यांच्यात अपघात झाला. अपघातावेळी स्कुटर चालक रस्त्यावर पडून जखमी झाला. अपघाताची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.