म्हापसा : कुचेली येथे दोन दुचाकींची धडक; एकजण ठार तर एकजण जखमी

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
29th December 2024, 09:41 am
म्हापसा : कुचेली येथे दोन दुचाकींची धडक; एकजण ठार तर एकजण जखमी

 म्हापसा : कुचेली-म्हापसा येथील कचरा प्रकल्पाजवळ दोन दुचाकींचा अपघात होऊन आरोन फर्नांडीस (२६, मायणा- शिवोली) याचा मृत्यू झाला. तर गंभीर जखमी रूद्वेक बांदोडकर (२१, कुचेली) याच्यावर गोमेकॉत उपचार सुरू.



हा अपघात शनिवारी मध्यरात्री घडला. मयत व जखमी युवक हे जीए ०३ एएस ८२४६ व जीए ०३ एक्यू ४७९६ या दुचाकीवरून तीन माड सडयेहून कुचेली येथे संभाषण करीत येत होते. कुचेली कचरा प्रकल्पासमोरील उतरणीवर त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण गेले व दोघांच्याही दुचाकी एकाच गतीने असल्याने त्यांची एकमेकांना धडक बसली. या अपघातात दोन्ही दुचाकी रस्त्याच्या कडेला कलंडल्या. त्यामुळे दोन्ही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले.




 जखमींना म्हापसा जिल्हा इस्पितळात दाखल केले असता डॉक्टरांनी आरोन फर्नांडीस यास मृत घोषित केले तर ऋग्वेद गाडगीळ याला पुढील उपचारासाठी गोमेकॉत हलवले. अपघाताचा पंचनामा म्हापसा पोलीस हवालदार शिवाजी शेटकर यांनी केला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आदित्य गाड करीत आहेत.

हेही वाचा