सासष्टी : मडगाव मार्केटमधील दुकानांना चोरट्यांनी केले लक्ष्य

तीन दुकाने फोडली, सहा दुकाने फोडण्याचा प्रयत्न

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
29th December 2024, 11:02 am
सासष्टी : मडगाव मार्केटमधील दुकानांना चोरट्यांनी केले लक्ष्य

मडगाव : मडगाव न्यू मार्केटमध्ये अज्ञात चोरट्यांनी तीन दुकाने फोडत काऊंटरमधील रोकड लंपास केली,  याशिवाय सुमारे सहा दुकाने फोडण्याचा प्रयत्न केला. याच बरोबर सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचीही तोडफोड केली. हा प्रकार म्हणजे तिघा अज्ञात चोरट्यांचे कृत्य असल्याचे सीसीटीव्हीमधून समोर आले आहे. 



मडगाव येथील मार्केट मधील दुकानांना आता चोरट्यांनी लक्ष केलेले आहे. राज्यात नाताळ व नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांची गर्दी वाढलेली आहे. याच कालावधीत मडगाव मार्केट मधील दुकाने फोडण्याचा प्रयत्न झाला. न्यू मार्केटमधील दुकानांमध्ये दुकानदार जास्त पैसे ठेवत नाहीत मात्र काउंटरमधील कुणाचे चार हजार तर कुणाचे पाच हजार असे पैसे चोरट्यांनी चोरून नेले आहे. शनिवारी रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला असून चोरट्यांनी मार्केटमधील सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची मोडतोड केलेली आहे. 




दुकानदारांनी सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहणी केली असता तिघा अज्ञात चोरट्यांचे हे काम असल्याचे दिसून आले. पोलिसांकडून घटनास्थळी पाहणी करण्यात आली असून नक्की किती दुकाने फोडली व किती दुकाने फोडण्याचा प्रयत्न झाला याची माहिती घेतली जात आहे. मडगाव न्यू मार्केटमधील या चोरीच्या प्रकारानंतर विक्रेत्यांकडून सुरक्षिततेचा  गंभीर प्रश्न उपस्थित झाला असून याकडे लक्ष देत पोलीस प्रशासनाने याठिकाणी गस्त वाढवावी अशी मागणी या विक्रेत्यांनी केलेली आहे.

हेही वाचा