पणजी : पेडे येथील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे बंद असलेले क्रीडा मैदान जनतेसाठी खुले करण्यात आले आहे. क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी हे मैदान जनतेसाठी खुले केले.
गेली अनेक महिने दुरुस्तीच्या कारणास्तवर पेडे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथील मैदान जनता तसेच खेळाडूंसाठी बंद ठेवण्यात आले होते. हे मैदान लवकरात लवकर जनतेसाठी खुले करावे अशी मागणी म्हापसावासीयांकडून करण्यात येत होती. या संदर्भात जॉगर्स सोशन असोसिएनशन या संस्थेने क्रीडामंत्री गोविंद गावडे यांची अनेकदा भेट घेत हे मैदान खुले करण्याची विनंती केली होती. मैदान लवकरच जनतेसाठी खुले करू असे आश्वासन प्रत्येकवेळी मंत्री गावडे यांनी दिले. अखेर दिलेला शब्द पाळत हे मैदान जनतेसाठी खुले करण्यात आले आहे.