केरळ : राजेंद्र आर्लेकर यांनी केरळच्या राज्यपालपदाची सूत्रे स्वीकारली

राजभवनवर घेतली गोपनीयतेची शपथ

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
02nd January, 01:49 pm
केरळ : राजेंद्र आर्लेकर यांनी केरळच्या राज्यपालपदाची सूत्रे स्वीकारली

तिरुवअनंतपुरम : राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी आज गुरवारी केरळच्या राज्यपालपदाची सूत्रे स्वीकारली. केरळ उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती नितीन मधुकर जमादार यांनी सकाळी १०.३० वाजता त्यांना राजभवनवर गोपनीयतेची शपथ दिली. 




दरम्यान बुधवारी त्यांनी गोव्याचे राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. सायंकाळी ते केरळच्या तिरुवअनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. येथे त्यांचे  केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन याआणि स्वागत केले. यानंतर राजभवनात आगमन होताच राज्यपालांचे अतिरिक्त मुख्य सचिव दवेंद्र कुमार धोडावत यांनी त्यांचे स्वागत केले.


केरळचे नवनियुक्त राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर (उजवीकडे) यांचे बुधवारी तिरुअनंतपुरममध्ये मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी स्वागत केले.

केरळचे नवनियुक्त राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर (उजवीकडे) यांचे बुधवारी तिरुअनंतपुरममध्ये मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी स्वागत केले.२३ एप्रिल १९५४ रोजी जन्मलेले आर्लेकर हे गोव्यात भाजपचे ज्येष्ठ सदस्य राहिले आहेत. राजेंद्र आर्लेकर हे लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडले गेले होते. १९८९ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. २००२ ते २००७ या काळात भाजपचे आमदार तसेच २०१२ ते २०१५ या काळात गोवा विधानसभेचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले आहे. या काळात त्यांनी गोवा विधानसभेचा कारभार पेपरलेस करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. २०१५-१७ दरम्यान ते गोव्याचे पंचायत,वन आणि पर्यावरणमंत्री होते. त्यानंतरच त्यांना हिमाचल प्रदेशचे राज्यपाल बनवण्यात आले. नंतर त्यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली. आता ते केरळचे राज्यपाल म्हणून काम पाहणार आहेत.


राजेंद्र विश्वनाथ अर्लेकर होंगे बिहार के नए राज्यपाल


पहा राजभवनावरील शपथविधी सोहळ्याची काही क्षणचित्रे 















हेही वाचा