कर्करोग रुग्णालयात ३०० खाटा उपलब्ध
बेळगांव : बेळगाव येथील केएलईच्या डॉ. संपतकुमार एस शिवनगी कॅन्सर हॉस्पिटलचे शुक्रवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उद्घाटन केले. कर्नाटकातल्या ग्रामीण आणि शहरी भागात ५० टक्क्यांपेक्षा जास्त संस्था स्थापन करणाऱ्या केएलई संस्थेचे कार्य कौतुकास्पद आहे. या संस्थेने राष्ट्रासाठी मोठे योगदान दिले आहे, असे मत यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केले.
संस्थेचे अध्यक्ष डॉ.प्रभाकर कोरे म्हणाले की, ३१० संस्था असलेली केएलई संस्था प्रामुख्याने गरिबांना शिक्षण व आरोग्य सेवा पुरवते. यामध्ये ४ हजारांहून अधिक खाटांचे रुग्णालय असून गरिबांसाठी एक हजार खाटांचे रुग्णालय स्थापन करण्यात आले आहे.
तर कर्करोग रुग्णालयात ३०० खाटा आहेत. बहुतांश संस्था ग्रामीण भागात स्थापन झालेल्या असून त्या अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांशी संलग्न आहेत.
या समाजपयोगी कामगिरीमुळेच संस्थेने आज जगात नाव कमावल्याचे उद्गारही कोरे यांनी काढले. या कार्यक्रमासाठी मंत्री डॉ. शरण प्रकाश पाटील, सतीश जारकीहोळी, खासदार जगदीश शेट्टर, महांतेश कौजलगी यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
केंद्र सरकारतर्फे आरोग्य क्षेत्रासाठी निधी उपलब्ध राष्ट्रपती
केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केएलई संस्थेची उभारणी आणि तिची कौतुकास्पद वाटचाल ठेवणाऱ्या तज्ज्ञ डॉ. प्रभाकर कोरे यांचे प्रयत्न वाखाणण्याजोगे आहेत, देशाला स्फूर्ती देणारे आहेत. केंद्र सरकारने ग्रामीण आरोग्य क्षेत्रासाठी अधिक निधी दिला असल्याचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी उद्घाटन प्रसंगी सांगितले.