यूपी : प्रयागराज महाकुंभमध्ये अघोरींच्या वेशात घुसू शकतात अतिरेकी : आयबीचे इनपुट

स्लीपर सेल सक्रिय झाल्याची माहिती उघड. याचा बीमोड करण्याकसाठी साधूंच्या वेशात ६ हजारांच्या आसपास गुप्त पोलीस तर एकूण सुरक्षेसाठी सुमारे ६० हजार पोलीस कर्मचारी असतील तैनात.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
03rd January, 11:01 am
यूपी : प्रयागराज महाकुंभमध्ये अघोरींच्या वेशात घुसू शकतात अतिरेकी : आयबीचे इनपुट

प्रयागराज : यंदा प्रयागराज येथे होणाऱ्या महाकुंभ मेळ्याची तयारी अंतिम टप्प्यांत पोहोचली आहे. दरम्यान याठिकाणी दहशतवाद्यांकडून विपरीत घटना घडवल्या जाण्याची दाट शक्यता लक्षात घेता सप्तसूत्री सुरक्षा यंत्रणेची मोट बांधण्यात येत आहे. दरम्यान इंटेलिजन्स ब्यूरो (आयबी ) आणि  लोकल इंटेलिजन्स युनिटच्या (एलआययू) अधिकाऱ्यांनी उत्तर प्रदेशच्या गृह खात्याला एक महत्त्वाचा गोपनीय अहवाल पाठवला आहे. यात खलिस्तानी आणि पाकिस्तानी दहशतवादी प्रॉक्सी किंवा स्लिपर सेल्सद्वारे महाकुंभ सोहळ्याला लक्ष्य करू शकतात, असा दावा करण्यात आला आहे. त्यांचे स्लीपर सेल नेटवर्क  सक्रिय करण्याचे कामही पाकिस्तानी दहशतवादी गटांनी सुरू केल्याची माहिती आयबीने यूपी गृह खात्याला दिली आहे. 


Maha Kumbh Mela 2025 eyes 50 Cr pilgrims in Prayagraj

 

दहशतवादी साधू, पुजारी, अघोरी आणि भगवे कपडे परिधान करून जत्रेत प्रवेश करू शकतात. आयबीच्या अहवालातही असेच काही इनपुट्स देण्यात आले आहेत. त्यामुळेच महाकुंभात साधूंच्या वेशात सुमारे ६ हजारांच्या आसपास गुप्त पोलीस तैनात करण्यात येत असून, ते जत्रेतील प्रत्येक घडामोडींवर लक्ष ठेवू शकतात. कुंभमेळ्यातील गर्दीच्या ठिकाणी विशेषतः  विविध आखाड्यातील पंडाल आणि संगम काठावर ते तैनात केले जातील.

सदर अहवाल गांभीर्याने घेत उत्तर प्रदेश गृहविभागाने आपल्या अधिकार क्षेत्रात असलेल्या सर्व सुरक्षा यंत्रणा सक्रिय केल्या आहेत. कुंभमेळ्यात एटीएस, आयबी, एसटीएफ, एलआययू, बॉम्ब निकामी पथक आणि एनआयएच्या पथके कार्यरत आहेत.


Latest Updates on Kumbh Mela 2025 | Prayagraj Kumbh UP


या अलर्टनंतर कुंभ परिसरात प्रवेश करणाऱ्या लोकांची कडक तपासणी सुरू झाली आहे. प्रत्येक एंट्री व एक्जिट पॉइंटवर पोलीस कर्मचारी रजिस्टर घेऊन उभे आहेत. चारचाकीने येथे येणाऱ्यांची नावे, पत्ते, मोबाईल क्रमांक नोंदवले जात आहेत. त्यांची आधारकार्डशी जुळवणी आणि पडताळणी केली जात आहे. संशयित वाहनांची कसून चौकशी केली जात आहे. संशयास्पद वाहने आणि लोकांचे फोटो काढून पोलिसांकडे उपलब्ध असलेल्या डेटाबेसशी जुळवून पडताळून घेतले जात आहेत.  यावेळी महाकुंभ सोहळा ४० हजार चौरस किलोमीटर परिसरात आयोजित करण्यात आहे. २०१९ साली आयोजित  कुंभाचे क्षेत्रफळ अवघे ३२०० चौरस किलोमीटर होते.


Prayagraj Kumbh Mela - 2025


याशिवाय, एआय आधारित सीसीटीव्ही कॅमेरे, ड्रोन आणि ड्रोनविरोधी यंत्रणांसह जत्रेची सुरक्षा अधिक मजबूत करण्यात आली आहे. या अहवालानंतर पोलीस विभाग आणि सायबर सेलने ६ हजारांहून अधिक असे सोशल मीडिया प्रोफाइल चिन्हांकित केले आहेत जे उपद्रव फैलावू शकतात. टेहळणी टॉवर्स उभारण्यात आले आहेट आणि कॉल इंटरसेप्शनद्वारे अनेक संशयितांवर २४  तास नजर ठेवली जात आहे. विशेष म्हणजे या तपासादरम्यान राज्य गुप्तचर विभागाला एका संशयास्पद सोशल मीडिया अकाउंटची माहिती मिळाली. त्यात दहशवादी कारवायांसंदर्भात 'सिक्रेट कोड' आढळून आले आहे.


Prayagraj News, Mahakumbh, Security, Multi Disaster Response Vehicle,  Disaster, Effective, State-of-the-Art Equipment, Life Jacket, Life Ring,  Rescue Fork, CM Yogi, Chief Fire Officer Pramod Sharma, Administration |  सुरक्षित महाकुंभ ...

राज्य पोलिस मुख्यालयातून जारी करण्यात आलेला गोपनीय अहवाल प्रयागराजचे पोलीस आयुक्त, पोलीस माहिती महासंचालक, अतिरिक्त पोलीस महासंचालक कायदा व सुव्यवस्था, अतिरिक्त पोलीस महासंचालक, अतिरिक्त पोलीस महासंचालक एटीएस उत्तर प्रदेश आणि आणि प्रयागराज जिल्ह्याचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक यांना पाठवण्यात आला आहे.  त्यानंतर या प्रकरणाची वेगवेगळ्या स्तरावर चौकशी सुरू झाली आहे.

सुरक्षेसाठी तब्बल ६० हजार पोलिसांची तैनाती 

यापेकी सुमारे ३७ हजार पोलीस कर्मचारी, १० हजार पोलीस अधिकारी, सुमारे १४ हजार होमगार्ड, ३ हजार महिला पोलीस कर्मचारी, २५० महिला पोलीस अधिकारी, २० कंपनी पीएसी, ४५ कंपनी पॅरामिलिटरी, आयआरएफ-७ हजार फायर सर्विस जवान आणि याव्यतिरिक्त सुमारे ५-६ हजारच्या आसपास विविध सुरक्षा व गुप्तहेर यंत्रणांचे गुप्त पोलीस देखील तैनात असतील. यापूर्वी २४ डिसेंबरला खलिस्तान जिंदाबाद फोर्सच्या (केजेएफ) तीन दहशतवाद्यांच्या पिलीभीतमध्ये झालेल्या चकमकीनंतर खलिस्तानी दहशतवादी पन्नूने  महाकुंभबाबत धमकी दिली होती. याप्रकरणी पिलीभीत पोलिसांनीही गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी चौकशी सुरू आहे.


Mahakumbh: U.P. police security model worth emulation, says MP delegation


३ लेयर सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित:

अशा धोक्यांना तोंड देण्यासाठी  प्रशासनाने तीन स्तरांची सुरक्षा प्रणाली तयार केली आहे. यापूर्वी ते १३  जानेवारीपासून कार्यान्वित होणार होते, परंतु सध्याच्या माहितीनुसार ते ३१ डिसेंबरच्या रात्रीपासून ते कार्यान्वित करण्यात आले आहे. यामध्ये कुंभ परिसरात प्रवेश करताना अनेक ठिकाणी चेक पॉईंट बसवण्यात आले आहेत, जे पहिल्या स्तरावरच जत्रा परिसरात पोहोचणाऱ्या व्यक्तीवर लक्ष ठेवतील.


Kumbh Mela 2025: Seven-Tier Security System Set for Safety of 40 Crore  Devotees in Prayagraj - www.lokmattimes.com


याशिवाय अंडरवॉटर ड्रोनचाही वापर केला जात आहे, जेणेकरून पाण्याखालील हालचालींवरही नजर ठेवता येईल. प्रशासनाने सायबर पेट्रोलिंग  करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये सोशल मीडिया अकाऊंटची तपासणी करण्यात येत आहे.

कुंभच्या इतिहासात प्रथमच कुंभ परिसरात सायबर पोलीस स्टेशनचीही निर्मिती करण्यात आली आहे. पोलिसांनी फ्युचर क्राईम रिसर्च फाउंडेशनची टीम नेमली आहे, जी आयआयटी कानपूरच्या टीमच्या सहकार्याने सायबर पेट्रोलिंगची व्यवस्था पाहणार आहे. जत्रा परिसरात २७०० सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. हे सर्व कॅमेरे एआय क्षमतेने सुसज्ज आहेत. हे कॅमेरे प्रमाणापेक्षा जास्त जास्त गर्दीची ठिकाणे चिन्हांकित करणे, बॅरिकेड उडी मारून जाणारे यात्री यांना चिन्हांकित करणे, संशयास्पद हाळचारिणवर लक्ष ठेवणे इत्यादी परिस्थितीत अलर्ट जारी करण्यास सक्षम असतील.


महाकुंभ 2025: आपदा प्रबंधन के लिए योगी सरकार ने बनाया ये मास्टर प्लान -  yogi government disaster management master plan kumbh 2025 spf6xh


दरम्यान प्रयागराज महाकुंभमध्ये दहशतवादी रासायनिक, जैविक, रेडिओलॉजिकल आणि अण्वस्त्रांचा वापर करून अधिक नुकसान करू शकतात. अशा हल्ल्यांनंतर बचावकार्य कसे होणार ? यासाठी २५  तज्ज्ञांची टीम तयार करण्यात आली आहे. खुद्द केंद्रीय गृहविभागाने एनआयएच्या माध्यमातून याची जबाबदारी घेतली आहे. किरणोत्सारी पदार्थामुळे बाधित व्यक्तीला किरणोत्सर्गी पदार्थांपासून मुक्त करण्यासाठी आवश्यक मशिन्स आणि उपचार केंद्रे बनविण्याची प्रक्रिया लवकरच सुरू झाली आहे. रासायनिक हल्ल्यासारख्या आपत्कालीन परिस्थितीसाठी स्वरूप राणी नेहरू रुग्णालयातील तीन मोठे वॉर्ड सर्व आवश्यक वैद्यकीय मशीन्स आणि बेड इत्यादी सुविधांनी सुसज्ज आहेत.


Mahakumbh 2025: Drones As 'Third Eye' In Yogi Adityanath's Hi-Tech Security  Initiative


जलमार्गावरून होणारे हल्ले रोखण्यासाठी १२  किलोमीटर नदीच्या बाजूचा परिसर सुरक्षित करण्यात आला आहे. या नदी वाहतूक व्यवस्थेअंतर्गत सुमारे ४००० बोटी धावतील. ५० महास्नान घाटांवर जलपोलीस बंदोबस्त ठेवणार आहेत. स्नान करताना भाविकांनी खोल पाण्यात जाऊ नये यासाठी ब्लॉक आणि जाळ्या बसवण्यात आल्या आहेत. अतिरिक्त सुरक्षेसाठी भारतीय नौदलाच्या २५ तज्ज्ञ पाणबुड्यांसह पीएसी, एसडीआरएफ आणि एनडीआरएफची टीमही तैनात करण्यात आली आहे. दहा पीएसी कंपन्यांचे सुमारे ८०० कर्मचारी, १५० एसडीआरएफ सदस्य, १२ एनडीआरएफ संघ आणि ३५ जल पोलीस कर्मचारी सुरक्षा ऑपरेशनसाठी तैनात असतील. सुरक्षितता लक्षात घेऊन पाणबुडे, खलाशी, मार्गदर्शक आणि दुकानदार यांच्यासाठी खास चिन्हांकित केलेले ट्रॅक सूट देण्यात आले आहेत. गुप्तहेर यंत्रणांच्या सूचनेनुसार वेळोवेळी येथील धोरणात बदल केले जात आहेत. 


हेही वाचा