मथुरा : घरवाली असताना बाहरवालीशी संग युवकाला पडला महागात

प्रकरण पोहोचले पोलीस स्थानकात

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
04th January, 01:11 pm
मथुरा : घरवाली असताना बाहरवालीशी संग युवकाला पडला महागात

मथुरा. विवाहित असूनही अन्य तरुणीसोबत विवाहबाह्य संबंध ठेवणे तरुणाला महागात पडले आहे. आता तरूण, पत्नी आणि अन्य युवती यांच्यातील वाद पोलीस स्थानकात पोहोचला असून, गावात चर्चेचा विषय ठरला आहे.  येथील सुरीर परिसरात एक तरुण डॉक्टर स्वतःचे  क्लिनिक चालवतो. सदर युवक विवाहित असून तो तीन मुलांचा बापही आहे.  क्लिनिकमध्ये तपासणी दरम्यान हा तरुण एका तरुणीच्या संपर्कात आला. हळूहळू त्यांच्यात प्रेम फुलू लागले. हा प्रकार पत्नीसह कुटुंबीयांना समजला. 

यावरून पती-पत्नीमध्ये अनेक भांडण झाले. एके दिवशी बायको रागावून आई-वडिलांच्या घरी गेली. पाच महिन्यांनी पत्नी घरी परतल्यावर घरातील दृश्य पाहून ती थक्क झाली. अन्य तरुणी देखील यावेळी तरुणाच्या घरीच.  दोघींनी तरुणावर आपला हक्क सांगितला व दोघांमध्ये वाद झाला. दोघींनी एकमेकींनच्या झिंज्या उपटल्या आणि एकमेकींना काहीप्रमाणात मारहाणही केली. यामुळे घरवाली आणि बाहरवालीच्या गुंत्यात अडकलेल्या तरुणाची कहाणी चव्हाट्यावर आली. 

माहिती मिळताच तरुणाच्या पत्नीसह तिच्या माहेरच्या कुटुंबीयांनी याप्रकरणी सुरीर पोलिस ठाण्यात अर्ज दिला. त्यांची बाजू मांडण्यासाठी पोलिसांनी काल शुक्रवारी दोघांनाही पोलीस ठाण्यात बोलावले. दोघांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर पोलिसांनी तरुणीला समजावून सांगितले. पुन्हा तरुणाला भेटू नये आणि त्याच्या पत्नीला त्रास देऊ नये, अशी सूचना केली. 

हेही वाचा