कार्यकर्त्यांच्या परिवाराची काळजी घेणार : सभापती तवडकर

काणकोण मंडळ अध्यक्षपदी प्रभाकर गावकर

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
06th January, 12:08 am
कार्यकर्त्यांच्या परिवाराची काळजी घेणार : सभापती तवडकर

काणकोण भाजप अध्यक्ष प्रभाकर गावकर यांचा सत्कार करताना सभापती रमेश तवडकर. सोबत संकल्प आमोणकर व इतर. 

काणकोण : भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते कधी वाईट कार्य करीत नाहीत. यापुढे कार्यकर्त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणे हे माझे कर्तव्य आहे. यापुढे त्याच्या परिवाराची काळजी घेणार. कार्यकर्ते समृद्ध व्हावे हे कर्तव्य पाळतानाच कुणाचे काय दुखणे आहे ते समजून घेऊन ते दुखणे निवारण करण्याचे कार्य करणार, असे काणकोणचे आमदार तथा सभापती रमेश तवडकर यांनी सांगितले.      

रविवारी काणकोण मतदारसंघातील ५९ या बुथवर नवीन अध्यक्ष व काणकोण मंडळ अध्यक्ष निवडण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. श्रीस्थळ पंचायत सभागृहात झालेल्या या बैठकीला निवडणूक अधिकारी म्हणून मुरगावचे

आमदार संकल्प आमोणकर, भाजपचे राज्य सचिव सर्वानंद भगत, मावळते अध्यक्ष विशाल देसाई, नवनिर्वाचित अध्यक्ष प्रभाकर गावकर, चंदा देसाई, मनुजा नाईक गावकर, महेश नाईक, सचिव संजीव तिळवे, सरचिटणीस विशांत गावकर, युवा अध्यक्ष रजनीश कोमरपंत उपस्थित होते.      

यावेळी संकल्प आमोणकर, सर्वांनंद भगत यांनीही मार्गदर्शन केले. गेली तीन वर्षे सर्वांच्या सहकार्याने आपण उत्तम प्रकारे कार्य करू शकलो असे सांगून विशाल देसाई यांनी सर्वांचे आभार मानले.  

हेही वाचा