दक्षिण गोव्यातील कोमुनिदाद समित्यांची निवड

दवर्ली अध्यक्षपदी साविओ ज्योकीम फिलीप कुरैया

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
06th January, 12:01 am
दक्षिण गोव्यातील कोमुनिदाद समित्यांची निवड

दवर्ली कोमुनिदादची नवनियुक्त समिती.      

मडगाव : दक्षिण गोव्यातील कोमुनिदाद समितींच्या निवडीसाठीची प्रक्रिया अजूनही सुरू आहे. रविवारी दक्षिण गोव्यातील दवर्ली, केळशी, मुरगाव, गावडोंगरी, खोला, मळकर्णे, चायफी, फातर्पा येथील कोमुनिदाद समित्यांची निवड झाली. तर कोरमअभावी कलाटा, धुंकळी, आरोशी व ओडार कोमुनिदादच्या निवडणुका झाल्या नाहीत.
कोमुनिदाद समित्यांच्या निवडणुका सध्या घेण्यात येत आहेत. यापूर्वी दक्षिण गोव्यातील केळशी, कोलवा, माजोर्डा, लोटली, आके, चिंचणी, दिकरपाल, कुडतरी, सांकवाळ, लोलये पोळे, नेत्रावळी, काकोडा, आवेडे, किटल या समित्यांची निवड झालेली आहे. तर ओर्ली, देवसू, सुरावली, उत्तोर्डा, कांसावली, चांदर, सारझोरा या समित्यांच्या निवडीसाठीची प्रक्रिया कोरमअभावी झालेली नाही.
रविवारी दवर्ली कोमुनिदादसाठी झालेल्या निवडणूक डेरिक परेरा व उबाल्डीना रॉड्रिग्ज यांच्या उपस्थितीत पार पडल्या. दवर्ली कोमुनिदादच्या अध्यक्षपदी साविओ ज्योकीम फिलीप कुरैया, अ‍ॅटर्नीपदी सेलेस्टिनो ए. बी. दी नोरोन्हा, खजिनदारपदी जिनो दी पिएदाद कुलासो हे विजयी झाले. त्यांनी लिओन्सिओ रायकर, सध्याचे अध्यक्ष रोशल फर्नांडिस, फातिमा रोचा यांच्या पॅनेलचा ५६ विरुद्ध ४२ अशा १४ मतांनी पराभव केला. सहअध्यक्ष म्हणून मेर्विन जे. आर. लिओपोल्डो क्रुझ, सह अ‍ॅटर्नीपदी सिल्व्हेस्टर निआस्सो व सहखजिनदारपदी जुआंव बुश मिरांडा यांची सर्वानुमते निवड करण्यात आलेली आहे.

हेही वाचा