ऑटोक्रॉस मोटार गाडी स्पर्धेत महिला श्रेणीत अश्रफी ठरली वेगवान चालक

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
01st January, 11:06 pm
ऑटोक्रॉस मोटार गाडी स्पर्धेत महिला श्रेणीत अश्रफी ठरली वेगवान चालक

काणकोण : फर्मागुडी फोंडा येथील अभियांत्रिकी क्रीडा मैदानावर ‘डर्ट ६’ या राष्ट्रीय पातळीवरील ऑटोक्रोस मोटार गाडी क्रीडा उपक्रमात वेगवान महिला चालक म्हणून मुळ काणकोणच्या अश्रफी शेट गायकवाड हिने विविध तीन पारितोषिके पटकावली. तसेच त्या गोव्याच्या महिला चालक श्रेणीत विजयी ठरल्या आहेत. ही स्पर्धा अखिल गोवा मोटारसायकल स्पोर्ट्स असोसिएशन्सने आयोजित केली होती.