मडगाव : मुंबई सीएसएमटी येथील प्लॅटफॉर्मच्या कामांमुळे कोकण रेल्वे मार्गावरील तीन गाड्यांचे थांबे बदलण्यात आले. ३१ जानेवारीपर्यंत मंगळुरु एक्स्प्रेस ठाणे तर जनशताब्दी, तेजस दादर स्थानकापर्यंत धावणार आहेत.
Short Termination of Trains at Thane & Dadar station. pic.twitter.com/aHbXddaILw
— Konkan Railway (@KonkanRailway) January 1, 2025
मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवरील १२, १३ क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मच्या विस्तारीकरणाच्या कामामुळे कोकण रेल्वे मार्गावरील तीन गाड्यांना ठाणे आणि दादर स्थानकापर्यंत थांबा देण्यात येणार आहे. प्लॅटफॉर्मचे काम पूर्ण न झाल्याने या गाड्यांचे थांबे बदल केलेले आहेत. रेल्वेकडून दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्र. १२१३४ मंगळुरु जं. - मुंबई सीएसएमटी एक्सप्रेसचा प्रवास ३१ जानेवारीपर्यंत ठाणे स्थानकापर्यंत असेल.
गाडी क्र. २२१२० मडगाव जं. - मुंबई सीएसएमटी तेजस एक्स्प्रेसचा प्रवासही ३१ जानेवारीपर्यंत दादर स्थानकापर्यंत कमी करण्यात आलेला आहे. गाडी क्र. १२०५२ मडगाव जंक्शन - मुंबई सीएसएमटी जनशताब्दी एक्स्प्रेसही ३१ जानेवारीपर्यंत दादर स्थानकापर्यंत धावणार आहे. प्रवाशांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे.