उर्वी, चंदनला दुहेरी विजेतेपद : उत्तर जिल्हा टेबल टेनिस असोसिएशन गोवातर्फे आयोजन
पणजी : स्व. मनोहर सावकार गोवा राज्य टेबल टेनिस चॅम्पियनशिप २०२४मध्ये इशिता कुलासो, उर्वी सुर्लकर आणि चंदन कारो यांनी विजेतेपद पटकावले तर इशिताने तिहेरी तर उर्वीने दुहेरी अजिंक्यपद मिळवले. मुलांच्या गटात चंदनने दोन विजेतेपद पटकावली. स्पर्धेचे आयोजन उत्तर जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनने गोवा टेबल टेनिस असोसिएशन आणि गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या सहकार्याने केले होते.
इशिता कुलासो हिने १३ वर्षांखालील, १५ वर्षांखालील आणि १७ वर्षांखालील मुलींच्या अंतिम फेरीत विजेतेपद मिळवून वयोगटातील तिची अष्टपैलुत्व आणि कौशल्य दाखवून तिच्या प्रतिभेची पुष्टी केली. महिलांच्या गटात उर्वी सुर्लकरने विजय मिळवत १९ वर्षांखालील मुलींच्या विजेतेपदाचा दुहेरी मुकुट मिळवला. मुलांमध्ये चंदन कारोने १३ वर्षांखालील आणि १५ वर्षांखालील गटात दुहेरी मुकुट जिंकून प्रभावित केले.
स्पर्धेतील अंतिम सामने रोमहर्षक ठरले. ११ वर्षांखालील मुलांच्या गटात युग प्रभूने इशान कुलासोचा पाच सेटच्या रोमहर्षक लढतीत (९-११, ११-५, १०-१२, ११-६, ११-५) असा पराभव केला. साची देसाईने ११ वर्षांखालील मुलींच्या विजेतेपदावर नाव कोरण्यासाठी तिशा शेखवर (११-९, ११-७, ११-५) ३-० असा विजय मिळवला. १३ वर्षांखालील मुलांच्या अंतिम फेरीत चंदन कारोने रुहान शेखचा सरळ सेटमध्ये (११-२, ११-३, ११-६) पराभव केला तर इशिता कुलासोने १३ वर्षांखालील मुलींच्या अंतिम फेरीत आर्ना लोटलीकर (११-२, ११-४, ११-५) विरुद्ध ३-० असा विजय मिळवून वर्चस्व राखले. १५ वर्षांखालील मुलांच्या अंतिम फेरीत चंदन कारोने रिशन शेखवर ३-१ (११-४, ९-११, ११-९, ११-९) अशी मात केली तर मुलींच्या १५ वर्षांखालील अंतिम फेरीत इशिता कुलासोने नीजा कामतचे कठीण आव्हान ३-२ने (१३-१५, ११-९, ११-८, ९-११, ११-३) मोडून काढले.
अॅरोन फारियासची चंदनवर मात