बार्देश : मालीम येथील नियोजित तरंगत्या जेटीचा प्रकल्प आराखडा केंद्राला सादर

१५ कोटी रूपये खर्चून तरंगत्या जेटीचा निर्माण करण्यात येईल : मंत्री निळकंठ हळर्णकर

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
30th December 2024, 03:31 pm
बार्देश : मालीम येथील नियोजित तरंगत्या जेटीचा प्रकल्प आराखडा केंद्राला सादर

पणजी : मालीम येथे मच्छीमाऱ्यांसाठी अद्ययावत सुविधा असलेल्या तरंगत्या जेटीचे काम लवकरच सुरू होणार आहे. मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत राज्याने केंद्राला प्रकल्प आराखडा (डीपीआर) सादर केलेला आहे. केंद्राने मान्यता दिल्यानंतर काम सुरू होणार असल्याची माहिती मच्छीमार खात्याचे मंत्री निळकंठ हळर्णकर यांनी दिली. 


Malim jetty's persistent filth & hygiene issues land in HC | Goa News -  Times of India


मच्छीमार खात्याचे मंत्री निळकंठ हळर्णकर यांनी खात्याच्या अधिकाऱ्यांसह मालीम जेटीला भेट देत पाहणी केली. मालीम जेटीच्या विस्ताराचे काम जीएसआयडीसीतर्फे सुरू आहे. हे काम संबंधित कंत्राटदाराने अर्धवट सोडलेले आहे. हे काम पूर्ण करण्याबाबत जीएसआयडीसीला कळविले जाईल. पाणी, प्रसाधनगृहांसह अन्य सुविधा निर्माण करण्यासह जेटीच्या विस्ताराचे काम सुरू आहे, असे हळर्णकर यांनी सांगितले. 

Dengue, cholera cases on rise at Goa jetty, says State Health Minister -  The Hindu


सध्याच्या जेटीचा विस्तार करण्याव्यतिरिक्त जवळच स्वतंत्र तरंगती जेटी उभारण्याचा प्रस्ताव आहे. याबाबतचा प्रकल्प आराखडा केंद्राला पाठविण्यात आला आहे. मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत तरंगती जेटी बांधली जाईल. स्थानिक मच्छीमाऱ्यांना अधिकाधिक सुविधा देण्याचाच उद्देश या मागे आहे. या कामाचा केंद्राकडे मी पाठपुरावा करणार आहे, असे हळर्णकर म्हणाले.


चतुर्थीवेळी कुटबण जेटीवरील कामगारांना कोलेराची लागण झाली होती. यामुळे कामगारांचा मृत्यूही झाला होता. यावर उपाय म्हणून जेटीवर स्वच्छता राखणे आवश्यक आहे. कुटबण जेटीवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. भविष्यात मालीम जेटीवरही सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येतील. स्वच्छता राखण्यासाठी प्रसाधनगृहे तसेच पाण्याची व्यवस्था करण्यात येईल. स्वच्छता राखण्यासह स्वत:च्या तब्येतीची तपासणी करण्याची जबाबदारी कामगारांची तसेच ट्रॉलरमालकांची आहे, असे मच्छीमार खात्याचे मंत्री निळकंठ हळर्णकर यांनी सांगितले.



हेही वाचा