म्हापसा : राज्यातील पोलीस स्थानकांमध्ये वास्को पोलीस स्थानकाला यंदाचे सर्वोत्कृष्ट पोलीस स्थानक म्हणून घोषित करण्यात आले. तर, म्हापसा व पर्वरी पोलीस स्थानकाला अनुक्रमे दुसरे व तिसरे स्थान मिळाले.
गोवा पोलीस स्थापना दिनाचे औचित्य साधून वरील तिन्ही पोलीस स्थानके २०२४ सालची सर्वोत्कृष्ट पोलीस स्थानके म्हणून पोलीस खात्यातर्फे जाहीर करण्यात आले आहे. पोलीस महासंचालक अलोक कुमार यांच्या मान्यतेनुसार मुख्यालयाचे पोलीस अधीक्षक नेल्सन अल्बुकर्क यांनी हा आदेश जारी केला आहे.
वास्को पोलीस स्थानकाला ३० हजार रूपये व चषक, म्हापसा पोलीस स्थानकाला २० हजार व चषक आणि पर्वरी पोलीस स्थानकाला १० हजार व चषक असे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. तसेच तिन्ही पोलीस स्थानकांच्या पोलीस कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्रे देण्यात येतील.