नो वाटण ना झंझट, अगदी साधी सोपी चिकनची रेसीपी
साहित्य :
पाव किलो चिकन, ३ बारीक चिरलेले कांदे, २ टोमॅटो, अर्धी वाटी कोथिंबीर, ४-६ हिरव्या किंवा लाल मिरच्या, आले लसूण, खडा मसाला न भाजता, अर्धा किंवा पाव वाटी दही, एक चमचा लिंबूचा रस, पाव वाटी कच्चे तेल.
कृती :
एक रिकामी वाटी घेऊन त्यात एक कोळसा घ्या व एक चमचा तूप त्यावर टाकून तो कोळसा पेटवून घ्या. आता एक कढई घ्या. त्यामध्ये सर्व वस्तु घाला. चिकनसहित सर्व मसाले पण घाला. चिकन एक सारखे मिक्स करून वरुन तेलाची धार सोडा. पेटलेला कोळसा असलेली वाटी तुपाची धार त्यावर सोडून आत ठेवा. झाकण पक्के लावा की त्यातून वाफ बाहेर जाणार नाही. ही कढई गॅसवर २० ते २५ मिनिट ठेवा. चिकन चांगलं शिजलं की चिकनचा वास येऊ लागेल. मग कढई खाली उतरवा.
हे चिकन तुम्ही गरम भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर खाऊ शकता. हे साधे सोपे चिकन तयार आहे.
कविता आमोणकर