खालील दिलेल्या स्टेप्स वापरुन करा पडताळणी
मुंबई : भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) कडे २०२३-२५ या आर्थिक वर्षात एकूण ८८०.९३ कोटी रुपयांची दावा न केलेली परिपक्वता रक्कम होती. सरकारी माहितीनुसार, एकूण ३. ७२ लाख पॉलिसीधारकांनी त्यांच्या मॅच्युरिटी बेनिफिटचा लाभ घेतलेला नाही. म्हणजेच ३ वर्षांच्या मुदतीनंतरही पॉलिसीवर कोणीही दावा केलेला नाही.
अशा परिस्थितीत, जर तुम्हाला असे वाटत असेल की तुमच्या कुटुंबातील कोणीतरी एलआयसी पॉलिसी घेतली आहे, जी परिपक्व झाली आहे परंतु तिचे पैसे मिळालेले नाहीत. तर तुम्ही खालील दिलेल्या स्टेप्स वापरुन त्या पॉलिसीच्या रकमेवर दावा करू शकता.
-LIC वेबसाइट https://licindia.in/home ला भेट द्या
-मुख्यपृष्ठावरील ग्राहक सेवा वर क्लिक करा.
-यावर जा आणि पॉलिसीधारकांच्या हक्क न केलेल्या रकमेचा पर्याय निवडा.
-पॉलिसी क्रमांक, नाव, जन्मतारीख आणि पॅन कार्ड क्रमांक यासारखे आवश्यक तपशील टाका
-यानंतर तुम्हाला अनक्लेम्ड मॅच्युरिटी असलेल्या पॉलिसीची माहिती मिळेल.
नियमांनुसार, ज्या पॉलिसींच्या मॅच्युरिटी रकमेचा दावा कोणीही केलेला नाही, ती अनक्लेम्ड खात्यात जमा केली जाते. १० वर्षे या रकमेवर कोणताही दावा न केल्यास ती ज्येष्ठ नागरिक कल्याण निधीमध्ये टाकली जाते. हा पैसा वृद्धांच्या देखभालीसाठी खर्च केला जातो.
१९५६पर्यंत १५४ भारतीय विमा कंपन्या, १६ विदेशी कंपन्या आणि ७५ भविष्य निर्वाह कंपन्या भारतात कार्यरत होत्या. १ सप्टेंबर १९५६ रोजी सरकारने या सर्व २४३ कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण केले आणि भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच एलआयसीची स्थापना केली. सध्या २५ कोटींहून अधिक लोकांकडे एलआयसी पॉलिसी आहेत.