मध्यप्रदेश : भोपाळच्या जंगलात बेवारस कारमध्ये सापडले ५२ किलो सोने आणि ११ कोटींची रोकड

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
9 hours ago
मध्यप्रदेश : भोपाळच्या जंगलात बेवारस कारमध्ये सापडले ५२ किलो सोने आणि ११ कोटींची रोकड

भोपाळ : आयकर विभागाला  गुरुवारी रात्री उशिरा मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे त्यांनी भोपाळच्या मेंदोरी जंगलात धडक छापेमारी करत एका कारमधून ५२  किलो सोने जप्त केले. याशिवाय ११ कोटी रुपयांची रोकडही जप्त करण्यात आली आहे. सदर कार बेवारस अवस्थेत आढळून आली. जप्त केलेल्या सोन्याची किंमत अंदाजे ४० कोटी ४७ लाख रुपये आहे. हे सोने आणि रोख कोणाचे आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.


आयकर विभाग ने कार से 52 किलो सोना जब्त किया है। अब तक 10 करोड़ नकद भी मिल चुके हैं। - Dainik Bhaskar

मध्य प्रदेशातील रिअल इस्टेट व्यावसायिकांवर छापेमारी करताना आयकर विभागाला (आयटी) हे मोठे यश मिळाले आहे. आयकर विभागाने मागील तीन दिवसांत भोपाळ आणि इंदूरमधीलतब्बल ५६ ठिकाणी छापे टाकले आहेत. प्राप्त माहितीनुसार सदर  सोने आणि रोख रकमेचा संबंध सध्याचे बिल्डर आणि पूर्वाश्रमीचे आरटीओ कॉन्स्टेबल सौरभ शर्मा यांच्याविरोधात सुरू असलेल्या कारवाईशी जोडलेला आहे का, याचा शोध घेतला जात आहे. ज्या कारमधून सोने आणि रोख रक्कम सापडली ती चेतन गौर नावाच्या व्यक्तीची असल्याचे सांगण्यात येत आहे. चेतन गौर हा  सौरभ शर्माचा मित्र आहे. 


भोपाल में मेंडोरी के जंगल से आयकर विभाग की टीम ने 52 किलो सोना बरामद किया है।

 

आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जंगलात एका कारमध्ये रोख रक्कम असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. यानंतर हे पथक गुरुवारी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास मेंदोरी येथे पोहोचले. जंगलात इनोव्हा कारजवळ जवळपास १०० पोलीस आणि ३० वाहने आधीच पोहोचली होती. बहुधा पोलिसांनाही याबाबत माहिती मिळाली असावी. आयकर पथकाने कारची झडती घेतली असता रोख रकमेसह सोने सापडले. इनोव्हा कार पूर्णपणे लॉक झाली होती. अशा स्थितीत आयकर अधिकाऱ्यांच्या पथकाला त्यांच्यासोबत आलेल्या गनमॅनने गाडीची काच फोडली. आतील एक बॅग बाहेर काढून उघडली असता सोने व रोख रक्कम पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. त्यानंतर या सर्व मुद्देमालाची मोजणी करून जप्त करण्यात आले.


आईटी की टीम को इस कार में सोना मिला है। इस कार का नंबर एमपी 07 बीए 0050 है।


दरम्यान, आता आयकर विभाग आणि पोलिसांचे संयुक्त पथक हे सोने कोणाचे आहे आणि कुठे नेले जात होते याचा शोध अधिकारी घेत आहेत. आजपर्यंत त्याचा कोणाशीही थेट संबंध नाही. या सोने आणि रोख रकमेवर अद्याप कोणीही दावा केलेला नाही. ही कार आरटीओ अधिकाऱ्याला जोडलेली असावी आणि धाड पडण्याच्या भीतीने निर्जन ठिकाणी लपवून ठेवली असावी, असा अंदाज आहे.


लोकायुक्त की टीम ने आरटीओ के पूर्व कॉन्स्टेबल के अरेरा कॉलोनी स्थित घर पर छापा मारा था।


दरम्यान, आयकर विभागाच्या तपासात ही कार चेतन गौर याची असल्याचे समोर आले आहे.  या प्रकरणी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी चेतन गौर याची चौकशी केली असता त्यांनी सोने आणि पैसे कोठून आले आणि ते कोणाचे आहेत याबद्दल कोणतीही माहिती नाही असे सांगितले. मात्र तो माजी आरटीओ कॉन्स्टेबल सौरभ शर्माचा मित्र असल्याचे त्याने निश्चितपणे कबूल केले. लोकायुक्त पथकाने १९  डिसेंबर रोजी सकाळी भोपाळच्या अरेरा कॉलनीतील माजी प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) कॉन्स्टेबल सौरभ शर्मा यांच्या घरावर छापा टाकला. येथून १.१५ कोटी रुपये रोख, अर्धा किलो सोने, हिरे, सोन्याचे दागिने आणि सुमारे ५० लाख रुपये किमतीच्या चांदीच्या अंगठ्यांसह मालमत्तेची कागदपत्रे जप्त करण्यात आली होती. शर्मा यांच्या कार्यालयातून १.७० कोटी रुपयांच्या रोख रकमेसह मालमत्तेची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.


गुरुवार को लोकायुक्त की टीम ने आरटीओ के पूर्व कॉन्स्टेबल सौरभ शर्मा के घर और दफ्तर पर छापा मारा था। उनके घर से चांदी की सिल्लियां मिली है।


या प्रकरणात माजी मुख्य सचिव आणि प्रधान सचिव स्तरावरील काही अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचा आयकर विभागाला संशय आहे. आयकर विभागात गेल्या काही महिन्यांत नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यानंतर मध्य प्रदेशात दर दिवशी हे पथक धडक कारवाई करत आहे. नवीन अधिकाऱ्यांची टीम लवकरच आणखी काही मोठे खुलासे करणार आहे.

भोपाळ आणि इंदूरमधील ५६  ठिकाणांवर छापे:

तीन दिवसांपूर्वी, १८ डिसेंबर रोजी भोपाळ आणि इंदूरमधील त्रिशूल कन्स्ट्रक्शन, क्वालिटी ग्रुप आणि इशान ग्रुपच्या ५६  ठिकाणांवर आयकर विभागाने छापे टाकले होते. यामध्ये भोपाळमध्ये सर्वाधिक ४९ ठिकाणांचा समावेश होता. यामध्ये आयएएस, आयपीएस आणि राजकारण्यांची विशेष पसंती असलेल्या नीलबाद, मेंदोरी आणि मेंडोरासारख्या क्षेत्रांचा समावेश होता.


हेही वाचा