मध्य प्रदेश : देवासमध्ये सिलिंडरचा भीषण स्फोट; आई-वडील आणि दोघा मुलांचा होरपळून मृत्यू

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
11 hours ago
मध्य प्रदेश : देवासमध्ये सिलिंडरचा भीषण स्फोट; आई-वडील आणि दोघा मुलांचा होरपळून मृत्यू

भोपाल :मध्य प्रदेशातील देवास येथे शनिवारी २१ डिसेंबर सकाळी सिलिंडरचा स्फोट होऊन झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. नयापुरा परिसरातील एका घरातील गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने आग लागली.  आग सुरुवातीला खालच्या मजल्यावर  लागली आणि धुराचे लोट वरच्या मजल्यावर पोहोचले. दुसऱ्या मजल्यावर झोपलेले दिनेश सुतार, त्यांची पत्नी गायत्री आणि त्यांची दोन मुले इशिका आणि चिराग यांचा श्वास गुदमरल्याने बेशुद्ध झाले व त्यांचा मृत्यू झाला.  

अरुंद रस्त्यामुळे बचावकार्यात अडचण :

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे अधिकारी अभिनव चंदेल ऊयायणी दिलेल्या माहितीनुसार, आग आटोक्यात आणण्यात खूप अडचणी आल्या. दुसऱ्या मजल्यावर जाणारा मार्ग खूपच अरुंद होता, त्यामुळे बचाव पथक तिथे पोहोचू शकले नाही. यावेळी घरातील सर्व सदस्य धुरामुळे बेशुद्ध होऊन त्यांना प्राण गमवावे लागले.  

दिनेश सुतार तळमजल्यावर डेअरी चालवतात. येथेच सिलिंडर ठेवण्यात आले होते. येथून आगीचा भडका उडाल्यानंतर आग सर्वत्र पसरली. अग्निशमन दलाला घटनास्थळी इतर सिलिंडरही सापडले, त्यामुळे आग विझवण्याचे काम अधिक कठीण झाले. ढिगारा आणि आगीमुळे बचावकार्यात अडथळे येत असल्याने कुटुंबाची वेळेत सुटका होऊ शकली नाही.  दरम्यान अपघाताचे गांभीर्य पाहून देवासचे एसपी पुनीत गेहलोतही घटनास्थळी पोहोचले . घटनेचे कारण शोधण्यासाठी त्यांनी एफएसएल टीमला पाचारण केले. प्राथमिक तपासात सिलिंडरचा स्फोट झाल्यामुळे अपघात झाल्याचे मानले जात आहे. डेअरीत सुरक्षा निकष पाळले गेले नाहीत, त्यामुळे हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले. 


हेही वाचा