जाणून घ्या या मागचे विज्ञान
मुंबई : आज शनिवार २१ डिसेंबर. आजच्या दिवशी ब्रह्मांडात एक विलक्षण खगोलीय घटना अनुभवता येणार आहे. आज सूर्याच्या दक्षिणायण प्रवासाची सांगता होत असून उत्तरायण प्रवास सुरू होत आहे. याच कारणास्तव आजचा दिवस हा छोटा तर रात्र मोठी असेल.
भारतीय वेळेनुसार दुपारी २.५० वाजता सूर्याची किरणे मकर वृत्ताच्या उष्ण कटिबंधात पडतील. यानंतर सूर्य कर्क राशीच्या दिशेने उत्तरायणाचा प्रवास सुरू करेल. शनिवारचा दिवस १० तास १९ मिनिटांचा असेल. तर रात्र १३ तास, ४१ मिनिटे असेल. म्हणजे दिवस आणि रात्र यात तब्बल तीन तास २२ मिनिटांचा फरक असेल.
हे का घडते ते जाणून घ्या
पृथ्वी आपल्या अक्षावर २३.५ अंशांनी झुकलेली आहे. शनिवारी पृथ्वीचा उत्तर ध्रुव सूर्यापासून सर्वात दूर असेल आणि दक्षिण ध्रुव सर्वात जवळ असेल. तसेच, सूर्य मकर राशीच्या उष्ण कटिबंधाला लंब (PERPENDICULER) असेल आणि कर्कवृत्ताला तिरकस स्पर्श करेल. या कारणास्तव आजच्या दिवशी लवकरच सूर्यास्त होईल. यानंतर, दिवसाचा कालावधी वाढेल आणि रात्री लहान होऊ लागतील. शनिवारपासूनच शरद ऋतूलाही सुरुवात होणार असून थंडीची तीव्रता आणखी वाढणार आहे.
एका वर्षात ३६५ दिवस असतात. प्रत्येक दिवसाला सरासरी २४ तास असतात, पण वर्षात चार दिवस असेही आहेट ज्यांची स्वतःची खासियत असते. हे चार दिवस म्हणजे २१ मार्च, २१ जून, २३ सप्टेंबर आणि २१ डिसेंबर. १४ जानेवारी रोजी संक्रांतीला सूर्य मकर राशीत प्रवेश करेल. आजच्या दिवस जागतिक ध्यान दिवस म्हणूनही साजरा केला जातो.