फोंडा : वेलकास - सावईवेरे येथील धोकादायक वळणावर कदंब बस व मारुती ओम्नी व्हॅन यांच्यात समोरासमोर टक्कर झाल्याने व्हॅन चालक गुरूदास दत्ता नाईक (५२, सावईवेरे) हा गंभीर जखमी झाला. अपघातात बस मधील सर्व प्रवाशी सुखरूप बचावले आहेत.
प्राप्त माहितीनुसार जीए - ०३- एक्स-०५१६ क्रमांकाची कदंब बस फोंडा येथे जात होती. त्यावेळी येथील धोकादायक वळणावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या जीए -०१-ई -३३९९ क्रमांकाच्या मारुती व्हॅनची धडक कदंब बसला बसली. यात व्हॅन चालक गंभीर जखमी झाला. जखमीला त्वरित १०८ रुग्णवाहिकेतून बेतकी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याला अधिक उपाचारासाठी गोमेकोत दाखल करण्यात आले. म्हार्दोळ पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत अपघाताचा पंचनामा केला आहे.