ब्राझील: बस आणि ट्रकच्या भीषण धडकेत तब्बल ३८ ठार; १३ जण गंभीर जखमी

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
4 hours ago
ब्राझील:  बस आणि ट्रकच्या भीषण धडकेत तब्बल ३८ ठार; १३ जण गंभीर जखमी

रिओ दी जानेरो : ब्राझीलमध्ये बस आणि ट्रक यांच्यात झालेल्या धडकेत ३८ जणांचा मृत्यू झाला आहे. मिनास गेराइसच्या तेओफिलो ओटोनी शहराजवळ हा अपघात झाला. समोर आलेल्या माहितीनुसार, या अपघातात १३  लोक जखमी झाले आहेत. त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही बस साओ पाउलोहून निघाली होती आणि त्यात ४५ प्रवासी होते. या अपघातात एका कारचीही बसला धडक बसली, मात्र त्यात प्रवास करणारे तिघे सुखरूप बचावले.


At least 38 people killed as bus and truck collide in Brazil | Brazil | The  Guardian

अपघाताचे कारण : बसचा टायर फुटला

बसचा टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस ट्रकवर आदळल्याचे काही लोकांनी सांगितले. अपघाताची नेमकी कारणे तपासली जात आहेत. ख्रिसमसच्या आधी ही दुर्घटना घडली, ही अत्यंत दुःखद बाब असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. पीडित कुटुंबांना सर्वतोपरी मदत करण्याचा आमचा प्रयत्न आहे.


Terrible tragedy': At least 38 killed in bus crash in Brazil | World News |  Sky News


ब्राझीलच्या वाहतूक मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, २०२४ मध्ये आतापर्यंत १०००० हून अधिक लोकांनी रस्ते अपघातात आपला जीव गमावला आहे. सप्टेंबरमध्ये ब्राझीलच्या फुटबॉल खेळाडूंना घेऊन जाणारी बस उलटून तीन जणांचा मृत्यू झाला होता. त्या बसमध्ये बसलेला कॉरिटिबा क्रोकोडाइल्स संघ रिओ दि जानेरो येथे होणाऱ्या चॅम्पियनशिप सामन्यात सहभागी होणार होता. अपघातानंतर हा सामना रद्द करण्यात आला.


38 people die in a crash between a passenger bus and a truck in Brazil

हेही वाचा