विधेयक याच अधिनेशनात येऊ शकते संसदेत
नवी दिल्ली : मोदी मंत्रिमंडळाने गुरुवारी ‘वन नेशन, वन इलेक्शन’ला मंजुरी दिली. आता ते लवकरच संसदेतही मांडले जाऊ शकते. संसदेच्या या हिवाळी अधिवेशनातच केंद्र सरकार हे विधेयक आणू शकते, असे सूत्रांनी सांगितले. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखाली ‘वन नेशन, वन इलेक्शन’साठी एक समिती स्थापन करण्यात आली होती, ज्याचा अहवाल नुकताच सादर करण्यात आला.
या अहवालानंतर आता मोदी सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी दिली आहे. सर्व पक्षांच्या सूचना घेण्यासाठी संसदेत एक जेपीसी देखील स्थापन केली जाऊ शकते. देशभरात वेळोवेळी एकाचवेळी निवडणुका घेण्यासाठी हा कायदा आणला जात आहे. याद्वारे विविध निवडणुकांवर वारंवार होणारा मोठा खर्चही टाळता येईल. मात्र, देशभरात एकाचवेळी निवडणुका घेण्यास विरोधक आहेत.
विधेयक संमत करून घेण्यासठी सर्व पक्षांशी चर्चा करूनच तो पास व्हावा, अशी सरकारची इच्छा आहे. ‘वन नेशन, वन इलेक्शन’ची चर्चा केवळ नेत्यांशीच नाही तर देशभरातील विचारवंत आणि राज्यांच्या विधानसभांच्या अध्यक्षांशीही होऊ शकते.