राजेंद्र आर्लेकर केरळच्या राज्यपालपदी

इतर पाच राज्यपालांचीही विविध राज्यांत नेमणूक

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
24th December, 11:15 pm
राजेंद्र आर्लेकर केरळच्या राज्यपालपदी

पणजी : बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची केरळच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राजेंद्र आर्लेकर यांची इतर पाच राज्यपालांसह विविध राज्यांत नियुक्ती करणारा आदेश जारी केला आहे.

केरळचे राज्यपाल म्हणून बदली झाल्याने मला आनंद होत आहे. केरळचा माणूस गोव्याचा राज्यपाल आहे आणि गोव्याचा माणूस केरळचा राज्यपाल असल्याचा हा योगायोग आहे. केरळमध्ये सीपीएमचे सरकार असले तरी घटनात्मकदृष्ट्या ते राज्यपालांचे सरकार असेल. यामुळे मला केरळमध्ये काम करण्याची संधी मिळेल, असे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी बदलीनंतर सांगितले. केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

राजेंद्र आर्लेकर हे प्रथम हिमाचल प्रदेशचे राज्यपाल होते. नंतर त्यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली. आता ते केरळचे राज्यपाल म्हणून काम पाहणार आहेत.

अजय कुमार भल्ला मणिपूरचे राज्यपाल

माजी केंद्रीय गृहसचिव अजय कुमार भल्ला यांची मणिपूरच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. माजी लष्करप्रमुख विजय कुमार सिंह मिझोरमच्या राज्यपालपदी तर डॉ. हरी बाबू कंभामपती यांची ओडिशाचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी ते मिझोरामचे राज्यपाल होते.