पहाडी चिकन तंदुरी

Story: चमचमीत रविवार |
08th December, 04:37 am
पहाडी चिकन तंदुरी

साहित्य :

अर्धा किलो चिकन कट मारून, २ चमचे आले लसूण पेस्ट, गरम मसाला एक चमचा, काळी मिरी पावडर अर्धा चमचा, १ चमचा धने-जिरे पावडर, मुठभर कोथिंबीर, मुठभर पुदिना, १-२ मिरच्या, घट्ट दही २-३ चमचे, १ लिंबू, मीठ चवीप्रमाणे, अमुल बटर, कोळसा. 

कृती :

चिकन स्वच्छ धुवून नंतर एका बाऊलमध्ये घट्ट दही, आले लसूण पेस्ट, मिरे पावडर, धने जिरे पावडर, मीठ, एका लिंबाचा रस, गरम मसाला, पुदिना-कोथिंबीर-हिरव्या मिरच्याचे वाटण चिकनला लावून व्यवस्थित कालवून घ्यावे व हे मिश्रण मॅरिनेट करायला ठेवावे. किंवा अधिक रुचकर बनण्यासाठी मॅरिनेट केलेले चिकन ८-९ तास फ्रीजमध्ये ठेवणे. करण्याआधी अर्धा तास फ्रीजमधून बाहेर काढावे. 

एका पॅनमध्ये अमुल बटर टाकून चिकनचे पिस शिजण्यासाठी ठेवावे. १० मिनिटे एक बाजू शिजून झाल्यावर नंतर दुसरी बाजू १० मिनिटे ठेवून शिजवून घ्यावे. त्यानंतर दुसऱ्या गॅसवर कोळसा गरम करण्यासाठी ठेवा व कोळसा छान लालबुंद गरम  झाला की पॅनमधल्या चिकनमध्ये थोडी जागा करून एक वाटी किंवा अॅल्युमिनियम फॉइलचा तुकडा ठेवून त्यामध्ये गरम कोळसा किंवा करवंटीचा तुकडा पेटवून त्याचा कोळसा करावा आणि तो ठेवावा. वरून अमुल बटर सोडून पटकन पॅनवर झाकण ठेवावे व आलेला धूर त्यात मुरू द्यावा. खायला तयार आहे मस्त चिकन तंदुरी!

-कविता आमाेणकर