‘पीएम जीवनज्योती’ अंतर्गत राज्यात ३.१० जणांनी घेतला विमा

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
04th December, 11:45 pm
‘पीएम जीवनज्योती’ अंतर्गत राज्यात ३.१० जणांनी घेतला विमा

पणजी : प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेंतर्गत राज्यातील ३.१० लाख लोकांनी विमा घेतला आहे. येत्या काही दिवसांत लाभार्थ्यांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न असल्याची माहिती युनियन बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय प्रमुख आशिष मालविया यांनी दिली. बुधवारी स्टार युनियन दायइचीतर्फे योजनेच्या जागृतीसाठी सुरू केलेल्या मोहिमेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी बँक ऑफ इंडियाचे विवेक दधीच, गुरुविंदर सिंग व अन्य अधिकारी उपस्थित होते.
मालविया यांनी सांगितले की, जीवन ज्योती विमा योजनेसाठी वार्षिक केवळ ४३६ रुपये भरावे लागतात. यामध्ये एका व्यक्तीचा २ लाख रुपये विमा उतरवला जातो. सर्वसामान्य व्यक्तींना किफायतशीर दरात उपलब्ध असणारा हा एकमेव विमा आहे. विम्याची कागदपत्रांवर देखील सहजपणे प्रक्रिया केली जाते. विम्याची रक्कम मिळवण्याची प्रक्रिया देखील सोपी आहे. राज्यातील सर्व लोकांनी या योजनेचा फायदा घ्यावा, असे आवाहन आम्ही करत आहोत.
गुरुविंदर सिंग यांनी सांगितले की, जागृती अभियानांतर्गत दोन्ही जिल्ह्यांत ५० ठिकाणी विमा रथ फिरणार आहे. आम्ही लोकांना या योजनेचे फायदे सांगून त्यांची नोंदणी करणार आहोत. १८ ते ५० वयोगटातील व्यक्तींसाठी ही योजना उपलब्ध असणार आहे. योजनेनुसार विम्याचा प्रीमियम ३१ मे रोजी भरावा लागणार असून विमा कव्हर १ जून ते ३१ मे पर्यंत असणार आहे. या योजनेंतर्गत विम्याचे दावे निकाली काढण्याचे प्रमाण देखील अधिक आहे.

हेही वाचा